भारतीय संघाचा खेळाडू एमएस धोनी याची गणना जगातील दिग्गज कर्णधारांमध्ये होते. धोनीला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. अशात मोठी बातमी समोर येत आहे. धोनीच्या नावाचा फायदा अपहरण करणाऱ्या व्यक्तीने घेतला आहे. त्याने एका दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण केले आहे. हे प्रकरण झारखंडची राजधानी रांची येथील आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पोलीस अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण जगन्नाथपूर येथील आहे. मधू देवी नावाची महिला आपल्या दोन मुलींसोबत एका दुकानातून कपडे खरेदी करत होती. यादरम्यान एक दुचाकीस्वार तिथे आला आणि त्याने म्हटले की, भारती माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) गरिबांना 5 हजार रुपये आणि घर देत आहे. मधूने त्या व्यक्तीच्या जाळ्यात अडकली आणि दुचाकीवर बसून त्याच्यासोबत गेली. तिने आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेतले आणि ती 8 वर्षीय मुलीला तिथेच एका स्टॉलवर सोडून गेली.
अपहरणकर्त्याने केली फसवणूक
त्यानंतर अपहरणकर्त्याने महिलेला वीज कार्यालयासमोर उतरवले आणि म्हटले की, इथेच कार्यालयात बैठक सुरू आहे. यावेळी मधूचे लक्ष विचलित होताच, आरोपीने तिच्या हातून मुलीला हिसकावले आणि तिथून फरार झाला. मधू त्याच्या मागे बरीच लांब धावली, पण त्याला पकडण्यात अपयशी ठरली. पीडितेने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.
तीन दिवस, पण कोणताच सुगावा नाही
या प्रकरणाविषयी पोलिसांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ते तपास करत आहेत आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल, पण अद्याप कोणताही सुगावा लागला नाहीये. पोलीस सातत्याने अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत, पण हाती काहीही लागले नाहीये. (shocking kidnapping of innocent child in the name of ms dhoni read here)
हेही वाचा-
‘मी तर त्याच दिवशी निवृत्त झालेलो, पण…’, 3 वर्षांनंतर धोनीचा गौप्यस्फोट, सांगितली Retirementची खरी तारीख
बलाढ्य इंग्लंडच्या नांग्या ठेचताच लंकन कर्णधाराने भरली हुंकार; म्हणाला, ‘आम्ही जर सलग 3 सामने…’