फुटबॉलविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. गुरुवारी (दि. 2 मार्च) रात्री उशिरा त्याच्या कुटुंबाच्या मालकीच्या दुकानावर बंदूकधाऱ्यांनी अचानक हल्ला केला. या गोळीबारात दुकानाच्या काचाही फुटल्या. या हल्ल्यानंतर बंदूकधाऱ्यांनी तिथे धमकीची नोटही सोडली. यामध्ये त्यांनी मेस्सीला धमकी दिली.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अर्जेंटिनाच्या रोसारियोमध्ये लिओनल मेस्सी (Lionel Messi) याच्या कुटुंबाचे सुपरमार्केट आहे. दोन बंदूकधाऱ्यांनी रात्री गोळीबार करत एकच खळबळ माजवली. त्यांनी दुकानावर जवळपास 14 गोळ्या झाडल्या. त्यामुळे दुकानासमोरील काचही फुटली. यावेळी त्यांनी मेस्सीसाठी धमकीचा मेसेजही सोडला. त्यात लिहिले होते की, “मेस्सी, आम्ही तुझी वाट पाहत आहोत. जावकिनही अं’मली पदार्थांचा एक तस्कर आहे, त्यामुळे तो तुझी काळजी घेऊ शकणार नाही.” ही माहिती स्थानिक पोलिसांनी माध्यमांना दिली.
https://twitter.com/Kigeziteensmg/status/1631317415232524288
गुरुवारी सकाळी झालेल्या हल्ल्यामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, हे अद्याप कळले नाही की, हल्लेखोरांनी देशाच्या तिसऱ्या सर्वात मोठ्या रोसारियो शहरातील यूनिको सुपरमार्केटवरच का निशाणा साधला.
मेस्सीच्या पत्नीच्या कुटुंबाच्या मालकीचे सुपरमार्केट
खरं तर, हे सुपरमार्केट लिओनल मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो (Antonela Roccuzzo) हिच्या कुटुंबाच्या मालकीचे आहे. शहाचे महापौर पाब्लो जावकिन यांनी रोसारियोमध्ये या सुपरमार्केटचा दौरा केला. तसेच, अं’मली पदार्थाशी संबंधित हिंसा रोखण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. रोसारियो देशाची राजधानी ब्यूनस आयर्सपासून उत्तर-पश्चिममध्ये जवळपास 300 किमी दूर आहे.
‘हल्ल्यात कोणालाही दुखापत नाही’
या संपूर्ण प्रकरणावर स्थानिक पोलीस सहाय्यक इवान गोंजालेज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या हल्ल्यापासून कोणताही धोका नव्हता. खरं तर, त्यांचा उद्देश लक्ष वेधने होते. जेव्हा हल्ला करण्यात आला, तेव्हा त्या सुपरमार्केटमध्ये कुणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नाही.”
जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या मेस्सीने या प्रकरणावर अद्याप कोणतेही भाष्य केले नाहीये. त्याच्या नेतृत्वात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अर्जेंटिनाने 36 वर्षांच्या दीर्घकाळानंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. तो सध्या पॅरिस सेंट-जर्मन संघाकडून फुटबॉल खेळत आहे. (Shocking Lionel Messi Receives Threatening Message read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! विश्वचषकात विक्रमी खेळी करणारा दिग्गज फुटबॉलपटू काळाच्या पडद्याआड, क्रीडाविश्वावर शोककळा
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे





