देशभरात हृदयविकाराचा झटका लागून निधन झाल्याच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. वयस्कर व्यक्ती असो किंवा लहान मुले, या संकटात सापडत आहेत. आता क्रिकेट जगतातूनही अशीच मन सुन्न करणारी घटना समोर येत आहे. पुण्यातील एका 14 वर्षीय मुलाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. हा मुलगा क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. ही घटना पुण्याच्या वानवडी परिसरातील आहे. या मुलाचं नाव वेदांत धमनगावकर असल्याचे वृत्त आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत धमनगावकर (Vedant Dhamangaonkar) हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. याची माहिती त्याने त्याच्या वडिलांना दिली. त्याच्या वडिलांनी लगेच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यानंतर तेथील डॉक्टरांनी वेदांतला मृत घोषित केले. डॉक्टरांनी सांगितले की, वेदांतचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले आहे
पोलीस काय म्हणाले?
डॉक्टरांनी वेदांतचे निधन नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची पुष्टी केली. त्यामुळे वानवडी पोलीस ठाण्यात अकस्मात निधनाची नोंद करण्यात आली. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी मुलाचे निधन झाल्याची बातमी परिसरात आग लागलेल्या वणव्यासारखी पसरली. दुसरीकडे, वेदांतच्या अचानक झालेल्या निधनामुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मुलांनाही हृदयविकाराच्या झटक्याचा धोका
हृदयात दोन कोरोनरी नसा रक्ताभिसरण करतात. याचमार्फत हृदयाला ऑक्सिजनचाही पुरवठा होतो. हे हृदयाच्या मांसपेशी जिवंत ठेवण्यासाठी खूपच गरजेचे असते. मात्र, जसजसे रक्ताभिसरण अचानक थांबते, तेव्हा हृदयाच्या मांसपेशींना इजा होते. अशा स्थितीला हृदयविकाराचा झटका म्हटले जाते. लहान मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका खूपच दुर्मिळ आहे, जोपर्यंत हृदयाच्या स्नायूंचा कोणताही गंभीर आजार नसतो तोपर्यंत. तज्ञांनुसार, आरोग्याच्या स्थितीमुळे लहान मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.(shocking maharashtra 14 years old kid died due to major heart attack while playing cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
माझ्या रे नादाला लागू नको! लाईव्ह सामन्यात जडेजाची हैदराबादी खेळाडूला खुन्नस; धोनीने केले शांत, Video
एवढी हिंमत! स्टंपमागे धोनी असताना फलंदाजाने घेतली धाव, मग पुढे जे झालं ते तुम्हीच पाहा