S Sreesanth Legal Notice: बुधवारी (दि. 6 डिसेंबर) लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात वाद झाला होता. यानंतर श्रीसंत गंभीरवर भलताच चिडला आहे. त्याने गुरुवारी (दि. 7 डिसेंबर) आपला राग सोशल मीडियावर व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत व्यक्त केला. यादरम्यान त्याने सांगितले की, गंभीरने त्याला सामन्यादरम्यान ‘फिक्सर’ म्हटले होते. मात्र, आता त्याला हा व्हिडिओ शेअर करणे महागात पडू शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार, लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) कमिशनरने एस श्रीसंत याला लीगल नोटीस (S Sreesanth Legal Notice) पाठवली आहे. श्रीसंतला पाठवलेल्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की, त्याने स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या कराराचे उल्लंघन केले आहे. तसेच, हेदेखील नोंदवले गेले आहे की, श्रीसंतशी तेव्हाच चर्चा केली जाईल, जेव्हा तो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील व्हिडिओ डिलीट करेल.
या वादानंतर पंचांनीही त्यांचा अहवाल पाठवला आहे. मात्र, श्रीसंतला ‘फिक्सर’ म्हटल्याविषयीच्या दाव्याबाबत काहीही सांगण्यात आले नाहीये. 6 डिसेंबर रोजी इंडिया कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स (India Capitals vs Gujarat Giants) संघातील एलिमिनेटर सामन्यादरम्यान एस श्रीसंत (S Sreesanth) आणि त्याचा माजी सहकारी गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात चांगलाच वाद झाला होता. त्यानंतर विश्वचषक विजेत्या खेळाडूंचे भांडण सोडवण्यासाठी पंचांना हस्तक्षेप करावा लागला. श्रीसंतने त्याच्या इंस्टाग्रामवर लाईव्ह येत म्हटले की, “तो लाईव्ह टीव्हीवर मला ‘फिक्सर फिक्सर’ म्हणत राहिला, तू फिक्सर आहे.”
S Sreesanth on Gautam Gambhir:
"He kept calling me a fixer".pic.twitter.com/qPtSdEXTjp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 7, 2023
View this post on Instagram
पुढे बोलताना तो म्हणाला की, “मी फक्त एवढंच म्हणालो की, तू काय करत आहेस. मी मजेशीर अंदाजात हसत राहिलो. जेव्हा पंचांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो त्यांनाही याच भाषेत बोलला.”
खरं तर, श्रीसंतवर आयपीएल 2013मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याच्या कथित सहभागामुळे बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने आजीवन बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 2019मध्ये ही बंदी कमी करत 7 वर्षे केली होती. (shocking S sreesanth in legal trouble after llc issues notice over fixer row involving gautam gambhir)
हेही वाचा-
कहर बॅटिंग, इतिहास घडला! टी10 क्रिकेटमध्ये फलंदाजाने 43 चेंडूत चोपल्या 193 धावा, सिक्सचा आकडा पाहून शॉकच बसेल
‘त्यांना रचिनची गरज…’, IPL 2024 Auctionपूर्वी इरफान पठाणचा ‘या’ संघाला मोलाचा सल्ला