टेनिसविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारताचा स्टार टेनिसपटू सुमित नागल आर्थिक संकटात सापडला आहे. त्याने एटीपी टूरमध्ये खेळण्यासाठी एक कोटी रुपयांच्या बजेटची व्यवस्था केल्यानंतर आता त्याच्या बँक खात्यात 1 लाखांपेक्षा कमी रुपये उरले आहेत. तसेच, तो चांगले आयुष्य जगू शकत नसल्यामुळे निराश आहे. हा तोच सुमित नागल आहे, ज्याने 2019च्या यूएस ओपन ग्रँड स्लॅममध्ये दिग्गज रॉजर फेडरर याला पहिल्या सेटमध्ये पराभूत केले होते. मात्र, सामन्यात त्याला 6-4, 1-6, 2-6, 4-6 अशा सेटमध्ये पराभूत व्हावे लागले होते. फेडररने त्याचे कौतुक करताना म्हटले होते की, “हा माझ्यासाठी खूपच कठीण सामना होता.”
भारताचा नंबर 1 टेनिसपटू सुमित नागल आर्थिक संकटाचा (Sumit Nagal Financial Crisis) सामना करत आहे. त्याच्या या स्थितीमुळे देशातील टेनिसपटूंच्या निधीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. हरियाणाच्या नागलने एटीपी टूर खेळण्यासाठी 1 कोटी रुपयांची व्यवस्था केल्यानंतर आता त्याच्या खात्यात 900 यूरो म्हणजेच जवळपास 80000 रुपये उरले आहेत.
Congratulations @nagalsumit.👏🏻🎾
You played one of the greatest players ever @rogerfederer & made him work hard for his win.
You can be proud of your achievement. New #SportsStar is born!🌟@Maheshbhupathi @Leander @MirzaSania @KirenRijiju @RijijuOffice @DGSAI #Tennis #USOpen pic.twitter.com/gekg5XzZvU
— SAI Media (@Media_SAI) August 27, 2019
नागल मागील काही वर्षांपासून जर्मनीच्या नानसेल टेनिस अकादमीत सराव करत होता. मात्र, पैशांच्या तंगीमुळे त्याला 2023च्या हंगामातील सुरुवातीच्या 3 महिन्यात आपल्या आवडत्या स्थानावर सराव करता आला नाही. त्याचा मित्र सोमदेव देववर्मन आणि ख्रिस्तोफर मार्कुइस यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात त्याची मदत केली होती.
पुरस्काराची रक्कम केली खर्च
एटीपी टूर खेळण्यासाठी सुमितने त्याच्या सर्व पुरस्कारांची रक्कम, आयओसीएलकडून मिळणारा पगार आणि महा टेनिस फाऊंडेशनकडून मिळणारा मदत निधीही खर्च केला आहे. त्याचा हा खर्च पाईनमध्ये सराव केंद्रात थांबणे आणि प्रशिक्षक किंवा फिजिओसोबत स्पर्धांसाठीच्या प्रवासावर होतो. तो म्हणाला की, “माझ्याकडे बँकेत एवढीच रक्कम उरली आहे, जेवढी वर्षाच्या सुरुवातीला होता. ती रक्कम 900 यूरो (जवळपास 80 हजार रुपये) आहे. मला थोडी मदतही मिळाली. माझ्याकडे कोणताही मोठा प्रायोजक नाही.”
This is the state of No1 tennis player of India!!!
Sad 😢#sumitnagal https://t.co/zzvzXATM6o— Amit Singh (@amitsingh13c) September 21, 2023
वार्षिक खर्च 1 कोटी, 65 लाखच कमावले
नागलने यावर्षी 24 स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यातून त्याने 65 लाख रुपयांची कमाई केली. त्याला सर्वात मोठी रक्कम यूएस ओपन (US Open) स्पर्धेत मिळाली, जिथे क्वालिफायर फेरीच्या पहिल्या टप्प्यात तो पराभूत झाला होता. तरीही त्याला 22000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच जवळपास 18 लाख रुपये मिळाले. तो म्हणाला, “मी जी कमाई करत आहे, ती खर्च करत आहे. एक प्रशिक्षकासोबत प्रवास करूनही माझा वार्षिक खर्च जवळपास 80 लाखांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंतचा आहे. मी जे काही कमावले आहे, ते खर्चही केले आहे.”
मिळाला नाही प्रायोजक
पुढे बोलताना तो म्हणाला, “मागील काही वर्षांपासून भारताचा नंबर 1 खेळाडू असूनही मला पुरेसे सहकार्य मिळत नाहीये. मी ग्रँड स्लॅमसाठी क्वालिफाय करणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तसेच, मी मागील वर्षी ऑलिम्पिकमध्येही एक सामना जिंकला होता तरीही सरकारने मला टॉप्समध्ये सामील केले नाहीये.” सुमित असेही म्हणाला की, “मला वाटते, दुखापतीमुळे जेव्हा माझी रँकिंग घसरली, तेव्हा कोणीही मला मदत करणे योग्य समजले नाही. कोणालाही विश्वास नव्हता की, मी पुनरागमन करू शकतो. हे निराशाजनक आहे. कारण, मला वाटते की, मी जे काही करत आहे, ते पुरेसे नाहीये. भारतात आर्थिक मदत मिळवणे खूपच कठीण आहे. प्रामाणिकपणे सांगतो, मला पुढे काय करायचे माहिती नाहीये. मी हार मानली आहे.”
बचतीच्या नावावर काहीच नाही
सुमित म्हणाला, “माझ्याकडे बचतीच्या नावावर काहीच नाहीये आणि मी खचून जात आहे. मी हे म्हणू शकत नाही की, मी खूप चांगले आयुष्य जगत आहे, जिथे मला काम करण्याची गरज नाही. मी मागील 2 वर्षांमध्ये खास कमाई केली नाहीये.”
सुमितबद्दल बोलायचं झालं, तर भारताचा हा स्टार खेळाडू एटीपी एकेरी रँकिंगमध्ये 159व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, ही रँकिंग भारतीयांमध्ये सर्वोत्तम आहे. (shocking sumit nagal struggle india number one tennis player financial crisis read here)
हेही वाचाच-
BREAKING: यूएस ओपनवर जोकोविचचेच अधिराज्य! मेदवेदेवला पछाडत जिंकले 24 वे ग्रँडस्लॅम
पुन्हा दिसले धोनीचे टेनिसप्रेम! यूएस ओपनमधील व्हिडिओ व्हायरल, कार्लोस अल्कारेजच्या जवळ बसलाय भारतीय दिग्गज