क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात सीएसकेने थाटात विजय मिळवला आणि ट्रॉफी आपल्या नावावार केली. मात्र, चेन्नई जिंकताच काही तासांनंतर नागपूर येथील कामठी भागातील एका व्यावसायिकाने गो’ळी झाडून आत्म’हत्या केल्याचे वृत्त समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती आयपीएलमध्ये बेटिंग करत असल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, स्वत:चं आयुष्य संपवणाऱ्या व्यक्तीचं नाव आयुष त्रिवेदी (Ayush Trivedi) असे आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा विजय होताच त्रिवेदीने स्वत:वर गो’ळी झाडत आत्महत्या केली. विशेष म्हणजे, त्या व्यक्तीचे वय फक्त 26 वर्षे आहे. तसेच, तो बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू पुरवण्याचे काम करत होता.
मंगळवारी (दि. 30 मे) सकाळी घरातील सर्व लोक हॉलमध्ये बसले असतानाच त्रिवेदीच्या खोलीतून मोठा आवाज आला. तो आवाज गो’ळी झाडल्याचा होता. त्यावेळी घरातील सर्व सदस्य धावत-पळत सुटले. दरम्यान तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला होता.
त्रिवेदीने मध्यरात्री आयपीएल 2023चा अंतिम सामना संपून त्यात सीएसके संघाचा विजय होताच आत्म’हत्या केल्याचे बोलले जात आहे. तो क्रिकेटवर सट्टा लावत असल्याचेही वृत्तांमध्ये सांगितले जात आहे. याच कामात तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता. त्यामुळे त्याने शेवटचा डाव म्हणून गुजरात टायटन्स संघावर पैसा लावला, पण गुजरातचा पराभव झाला आणि त्याला हे टोकाचे पाऊल उचलावे लागल्याचे बोलले जात आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब अशी की, त्रिवेदीकडे पिस्तूल आली तरी कोठून? याचा पोलीस तपास करत आहेत. (Shocking this person commits suicide by shooting himself after csk won ipl 2023 title)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! ‘या’ देशात सेक्सला खेळ म्हणून मान्यता, 16 प्रकारात रंगणार स्पर्धा; 45 मिनिटे चालणार सामना
मन सुन्न करणारी घटना! ओडिसा रेल्वे भीषण अपघातावर व्यक्त झाला विराट; म्हणाला, ‘खूपच दु:ख…’