क्रिकेट विश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी गुजरातमधील आहे. अहमदाबादमध्ये क्रिकेट खेळत असताना सरकारी कर्मचाऱ्याला शनिवारी (दि. 25 फेब्रुवारी) हृदयविकाराचा झटका बसला. यानंतर काही वेळेतच त्या व्यक्तीचे निधन झाले. यादरम्यानचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. या व्हिडिओत दिसते की, कशाप्रकारे मैदानावरच खेळाडूची तब्येत बिघडली आणि तो तिथेच बसला.
ज्या व्यक्तीचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला, तो व्यक्ती एसजीएसटी (state goods and service tax) विभागातील 34 वर्षीय वरिष्ठ कर्मचारी वसंत राठोड (Vasant Rathod) होते. ही घटना भदजमध्ये डेंटल सोल्लगेच्या मैदानावर घडली. माध्यमांतील वृत्तांनुसार, गुजरातमध्ये 10 दिवसांपेक्षा कमी काळातील ही तिसरी घटना आहे. व्हिडिओत दिसते की, राठोड क्षेत्ररक्षण करत असलेल्या संघाकडून खेळत होते. जेव्हा ते क्रीझवर गोलंदाजी करताना व्यवस्थित दिसत होते.
અમદાવાદમાં ક્રિકેટ મેચ દરમિયાન ગ્રાઉન્ડ પર GST અધિકારી ઢળી પડ્યા, જુઓ (LIVE દ્રશ્યો)#ahemdabad #bhadaj #Cricket #heartattck #gstofficer pic.twitter.com/bENl6UCcmp
— Watch Gujarat (@WatchGujarat) February 26, 2023
परंतु अचानक वसंत यांच्या छातीत दुखायला लागले, त्यानंतर ते गोलंदाजी सोडून तिथेच बसले. पंचांसोबतच संघ सहकारी तातडीने त्यांच्याजवळ आले आणि मदतीचा इशाराही केला.
वसंत राठोड यादरम्यान अस्वस्थ दिसत होते. ते कधी बसायचे, तर कधी झोपायचे. अचानक ते खाली झोपले आणि त्यावेळी त्यांचे सहकारी खेळाडूही तिथेच होते. वसंत यांना डेंटल कॉलेजात नेण्यात आले, जिथे सामना होत होता. त्यांची ऑक्सिजन मात्रा कमी होत गेली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले गेले. या घटनेमुळे त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे. (shocking video from gujarat cricketer suffer heart attack on cricket field dies on ground)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘दादा’चे आयपीएलमधील 5 आवडते युवा खेळाडू कोण? स्वत:च सांगितली नावे
‘भारतीय संघात कोणताही उपकर्णधार नको, कारण…’, रवी शास्त्रींनी ठणकावूनच सांगितलं