जगभरातील अनेक देशांप्रमाणेच सध्या भारतही कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. सध्या भारतातील परिस्थिती बिकट होत आहे. रोज लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत आहे. त्याच वैद्यकिय सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच या विळख्यात सामन्य व्यक्तीपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण अडकले आहेत. आता नुकतेच असेही वृत्त आले आहे की ‘शुटर दादी’ नावाने प्रसिग्ध असलेल्या नेमबाज चंद्रो तोमर या देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.
याबद्दल त्यांच्या ट्विटर हँडेलवर माहिती दिली आहे. ट्विट करण्यात आले आहे की ‘दादी चंद्रो तोमर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ईश्वर सर्वांचे रक्षण करो – परिवार.’
https://twitter.com/realshooterdadi/status/1386723591518003206
सध्या ८९ वय असलेल्या चंद्रो तोमर यांनी नेमबाजीमध्ये विक्रम केले आहेत. त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षांनंतर अनेक राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांनी त्यांची बहिण प्रकाशी तोमर यांच्यासह अनेस स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे. या दोन्ही तोमर भगिनींना जगातील सर्वात जेष्ठ नेमबाजांपैकी एक मानले जाते. तसेच त्यांच्या जीवनावर काहीवर्षांपूर्वी ‘सांड की आँख’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
शुटर दादी लवकर बरी व्हावी म्हणून शुभेच्छा
चंद्रो तोमर या कोरोनातून लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना तसेच शुभेच्छा दिल्या आहेत. यात कंगना राणौत, गिरिमा चौधरी, मनोज कुमार अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
https://twitter.com/KanganaTeam/status/1386887692370153480
https://twitter.com/gcjudo/status/1386728175242076166
https://twitter.com/BoxerManojkr/status/1386724079798001664
तोमर भगीनींनी अनेक अडथळे पार करत तसेच आजूबाजूच्या लोकांचा विरोध पत्करत त्यांच्या कारकिर्दीत मोठे यश मिळवले. आत्तापर्यंत चंद्रो तोमर यांनी अनेक पदके आणि पुरस्कार देखील मिळवले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
रियान पराग म्हणतो, जान्हवी कपूरप्रमाणे डान्स करायचा होता, पण नंतर…
विराट आणि एबी स्वतःचं एक प्रशिक्षक आहेत; जाणून घ्या का असे म्हणाले आरसीबीचे कोच