---Advertisement---

वरिष्ठ राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या श्रावणी कटके हिला सुवर्णपदक

On: बुधवार, मार्च 10, 2021 1:00 PM
---Advertisement---

पुणे : २९ वी वरिष्ठ राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा २०२२-२१ चंदीगढ युनिव्हर्सिटी, मोहाली, पंजाब येथे झाली. यामध्ये महाराष्ट्र संघाने १ सुवर्ण पदक, २ रौप्य पदके आणि २ कांस्य पदकांची कामगिरी केली. पुण्याच्या श्रावणी कटके हिने स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.

स्पर्धेच्या उद्घाटनासाठी पंजाबचे क्रीडामंत्री सुरेंद्रसिंह सोढी उपस्थित होते. पारितोषिक वितरण समारंभासाठी वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भूपेंद्र बाजवा, सीईओ सोहेल अहमद, सहसचिव सोपान कटके, द्रोणाचार्य अ‍ॅवॉर्डी कुलदिप सिंह हंडू उपस्थित होते. स्पर्धेत भारतातील राज्य, केंद्रशासित प्रदेश मिळून ४२ संघ उपस्थित होते. ही स्पर्धा सांशू व तावलू या प्रकारात आयोजित करण्यात आली होती.

तावलू कुंफूतायची फॅन मध्ये श्रावणी कटके हिने (गुणांक ७.००) सुवर्णपदक पटकाविले. स्नेहल बडस्कर (गुणांक ६.९०) आणि मिताली वाणी (गुणांक ६.८०) यांनी रौप्यपदक पटकाविले. तावलू तायचीक्वॅन मध्ये श्रावणी कटके (गुणांक ७.७०), मिताली वाणी (गुणांक ७.०१) यांनी कांस्यपदक पटकाविले.

ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे सचिव सोपान कटके, संघ व्यवस्थापक दिपक माळी, संदीप शेलार यांचे स्पर्धकांना मार्गदर्शन मिळाले.

महत्त्वाच्या बातम्या-

“अक्षरच्या प्रदर्शनानंतर जडेजाचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणे कठीण”

थाला इज बॅक! विरोधी संघांची उडाली झोप, धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

“विश्वास ठेवा, तो नक्कीच धावा करेल,” खराब फॉर्ममध्ये असलेल्या शुबमनचा भारतीय दिग्गजाकडून बचाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---