भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याने मंगळवार रोजी (०६ डिसेंबर) आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. जन्मदिनानिमित्त आजी-माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. श्रेयसची धाकटी बहिण श्रेष्ठा अय्यर हिनेही आपल्या भावाला मजेशीर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रेष्ठाने तिचा आणि श्रेयसचा एक इंस्टा रिल बनवत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्याकडून बऱ्याचदा चूका झाल्या असल्याचे दिसते आहे. व्हिडिओत सुरुवातीला श्रेयस बरोबर कृती करतो पण श्रेष्ठाकडून चूक होते. यावर श्रेयस आनंदाने उड्या मारतो आणि चुकून त्याचा पाय श्रेष्ठाच्या पायावर पडतो. यामुळे ती वेदनेने व्हिवळताना दिसते. पुढे ते दोघेही पुन्हा अचूक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात परंतु ३-४ वेळा त्यांचा हा प्रयत्न विफळ ठरतो.
यादरम्यान ते भरपूर मस्ती करताना आणि व्हिडिओ बनवण्याचा आनंद घेताना दिसतात. तसेच या व्हिडिओद्वारे त्यांच्यात एका बहिण-भावामध्ये असणाऱ्या गोड अशा नात्याचीही झलक दिसते आहे.
हा व्हिडिओ शेअर करत श्रेष्ठाने त्यावर गमतीशीर कॅप्शन दिले आहे की, ‘माझ्या मोठ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे (पण त्यापेक्षाही जास्त मी तुझा द्वेष करतो! आणि हा, तुला आठवण करून देऊ इच्छिते की, तू खरचं खूप नशीबवान आहेस की मी तुझी बहिण आहे. जर तुला वेगळी बहीण असती तर तुझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. पण मीच तुझी बहिण बनल्यामुळे तुझी आभारी आहे.‘
https://www.instagram.com/reel/CXIa6GCgLd0/?utm_source=ig_web_button_share_sheet
श्रेयसची बहीण श्रेष्ठा अय्यर ही डान्सर आणि कोर्योग्राफर आहे. तसेच तो संतोष अय्यर या मुंबईतील बिजनेसमनचा मुलगा आहे. त्याची आई रोहिनी या गृहीणी आहेत. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अय्यरने २०१७मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते.
त्याने मागील काही वर्षांत चांगली कामगिरी करत स्वत:ला मधल्या फळीतील फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. तसेच तो आता मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाचा नियमित सदस्य बनला आहे.
त्याने आत्तापर्यंत २२ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकांसह ८१३ धावा केल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये त्याने ३२ सामने खेळले असून यात त्याने ५८० धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले असून २ सामन्यांत १ शतक आणि १ अर्धशतकासह २०२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आर अश्विनची बातच न्यारी!! ‘असा’ कारनामा करत कुंबळे-मुरलीधरनसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
एका दिग्गजाची दुसऱ्या दिग्गजाला दाद! आर अश्विनकडून एजाज पटेलला खास भेट, व्हिडिओ व्हायरल
संघ वेगळे, पण नावांनी जोडले! मुंबई कसोटीनंतर वानखेडे स्टेडियमवर दिसले अनोखे दृश्य






