इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ चा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. तत्पूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मेगा लिलाव पार पडला. बंगळुरू येथे झालेल्या या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात जायंट्स या २ नव्या संघांसह जुने ८ संघ सहभागी झाले होते. त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना आपल्या ताफ्यात सहभागी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लिलावातील लक्षवेधी चेहऱ्यांपैकी एक राहिला, भारताचा मधळ्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर.
श्रेयसला विकत घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये स्पर्धा पाहायला मिळाली. तो २ कोटींच्या बेस प्राईजसह लिलावात उतरला होता. पण अखेर कोलकाता नाईट रायडर्सने १२ कोटी २५ लाखांना त्याला विकत घेतले आहे.
.@ShreyasIyer15 is SOLD to @KKRiders for INR 12.25 Crore 👌💰👏#TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 12, 2022
श्रेयस दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि खेळाडू राहिला आहे. गतवर्षी त्याने दिल्लीकडून खेळताना ८ सामन्यात १७५ धावा केल्या होत्या. त्याच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीचा संघ २०२० आयपीएल हंगामाचा उपविजेता राहिला होता. श्रेयसच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्याने एकूण ८७ सामने खेळताना २३७५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे! विलियम्सनने चक्क डावा हात कापण्याचा केलेला विचार, वाचा नक्की काय झालं होतं
अष्टपैलू खेळाडू असावा तर ‘असा’ आयपीएल ऑक्शनपूर्वी, सलग ५ व्या सामन्यात पटकावला सामनावीर पुरस्कार