---Advertisement---

सूर्या-हार्दिकपेक्षा चांगला कर्णधार बनू शकतो श्रेयस अय्यर, ही आहेत 3 मोठी कारणं

On: बुधवार, जुलै 17, 2024 6:54 PM
---Advertisement---

रोहित शर्मानं टी20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या घोषणेनंतर आता सर्वांच्या नजरा टीम इंडियाच्या पुढील कर्णधाराकडे लागल्या आहेत. या शर्यतीत हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांची नावं पुढे येत आहेत. मात्र आता या शर्यतीत श्रेयस अय्यर वाईल्ड कार्ड एंट्री करू शकतो. श्रेयस अय्यरला भारतीय टी20 संघाचं कर्णधारपद का मिळावं? यामागची तीन मोठी कारणं आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगतो.

(1) कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध केलं – श्रेयस अय्यर हा आयपीएलचा पहिला कर्णधार आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळे संघ फायनलमध्ये पोहोचले आहेत. गौतम गंभीरनं कर्णधारपद सोडल्यानंतर श्रेयसनं दिल्ली कॅपिटल्सची कमान सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली संघानं 2020 मध्ये फायनलपर्यंत मजल मारली. याशिवाय केकेआरसोबतचा त्याचा विक्रमही उत्कृष्ट राहिला आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली केकेआरनं 2024 मध्ये 10 वर्षांनंतर विजेतेपद पटकावलं.

(2) उत्तम मॅनेजमेंट कौशल्यं – श्रेयस अय्यर हा टीम इंडियातील सर्वात अनुभवी खेळाडू नसला तरी वरिष्ठ खेळाडूंना कसं सांभाळायचं हे त्याला चांगलं माहीत आहे. दिल्ली कॅपिटल्समध्ये असताना त्यानं रिकी पाँटिंग, गौतम गंभीर आणि इशांत शर्मा यांसारख्या वरिष्ठ खेळांडूंसह काम केलं आहे. शिवाय केकेआरमध्ये त्यानं ब्रेंडन मॅक्क्युलम, चंद्रकांत पंडित आणि गौतम गंभीर यांच्यासोबत काम केलंय. श्रेयस युवा आणि अनुभवी खेळाडूंना सोबत घेऊन चालण्यात माहीर आहे. अशा स्थितीत तो एक चांगला कर्णधार बनू शकतो.

(3) खेळाची उत्कृष्ट समज – आयपीएलम 2024 मध्ये श्रेयस अय्यरनं सिद्ध केलं आहे की तो प्रत्येक संघ आणि प्रत्येक खेळाडूसाठी विशिष्ट योजना बनवण्यात माहीर आहे. त्यानं हर्षित राणा सारख्या गोलंदाजाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून वापर केला. दिल्लीतही त्यानं असंच काहीसं केलं होतं. तेव्हा त्यानं इशांत शर्माला नवा चेंडू सोपवला होता, ज्यानंतर इशांतला बरंच यश मिळालं. उमेश यादवनं देखील श्रेयस अय्यरच्या नेतृत्वगुणांचं कौतुक केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

गंभीरचं चाललंय तरी काय, नव्या प्रशिक्षकाने पहिल्याच बैठकीत असं काय केलं ज्यामुळे मिटिंग पुढे ढकलली…
सूर्यकुमार कर्णधार झाला तर उपकर्णधार कोण होणार? बुमराह-पंतसह हे 5 खेळाडू शर्यतीत
अमित मिश्राच नाही तर या क्रिकेटपटूंनीही केली आहे वयात गडबड, एकानं यावर्षीच जिंकला आयपीएल खिताब

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---