सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना चट्टोग्राम येथे सुरु आहे. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यर याने अर्धशतक झळकावत एक इतिहास घडवला आहे. श्रेयसने या सामन्यात अशी एक गोष्ट केली आहे जी भारताच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे.
या सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने 93 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. कसोटी सामन्यात सुरुवातीच्या 10 डावांमध्ये त्याने 5 वेळा अर्धशतकी टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या 10 डावांमध्ये प्रत्येेक डावात दोन अंकी धावसंख्या करणारा श्रेयस अय्यर पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 डावांमध्ये तो एकदाही एकेरी धावसंख्येवर बाद झाला नाही. भारताच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा श्रेयस अय्यर पहिला खेळाडू आहे.
कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर याचे प्रदर्शन
105,65,18,14, 27,92,67,15,19,82*(या सामन्यात)
श्रेयस अय्यर याने न्यूझीलंड विरुद्ध 25 नोव्हेंबर 2021ला कानपूरमध्ये आपले पदार्पण केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 105 आणि 65 धावांंची खेळी केली होती. त्याने आतापर्यंत 6 सामन्यांच्या 10 डावात 51 पेक्षा जास्तच्या सरासरीने 472 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.भारतीय संघाला श्रेयस अय्यरच्या रुपात एक विश्वासार्ह फलंदाज मिळाला आहे. त्याने आतापर्यंत फक्त 5 आणि 6 क्रमांकावर फलंदाजी केली आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवसाअखेर भारताने 90 षटकांमध्ये 6 गडी गमावत 278 धावा केल्या. या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि श्रेयस अय्यर यांचे महत्वाचे योगदान होते. पुजारा 203 चेंडूत 90 धावा करत बाद झाला, तर श्रेयस अय्यर 82 धावांवर नाबाद आहे. (Shreyas Iyer created history in Indian Test Cricket and became first player to score double digit score first 10 innings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आतापासूनच सचिनची बरोबरी करू लागला अर्जुन! रणजी पदार्पणाच्या सामन्यात गोव्यासाठी शतकीय खेळी
पहिल्या कसोटीत विराट स्वस्तात बाद! बांगलादेशी फिरकीपटूच्या जाळ्यात सहज अडकला माजी कर्णधार