भारत आणि न्यूझीलंड (NZvIND) यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहेत. यातील पहिला सामना शुक्रवारी (25 नोव्हेंबर) ऑकलंडच्या इडन पार्कवर खेळला गेला. यामध्ये भारताने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 306 धावसंख्या उभारली. या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर याने केल्या. त्याने 76 चेंडूत 80 धावा केल्या आणि न्यूझीलंडमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
भारताकडून न्यूझीलंडमध्ये वनडे क्रिकेटच्या प्रकारात लागोपाठ 50 किंवा 50 पेक्षा धावा सर्वाधिक वेळा करण्याचा विक्रम श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने आपल्या नावावर केला. विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर यांनाही अशी कामगिरी जमली नाही. अय्यरने मात्र न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ चार वेळा वनडेत 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर न्यूझीलंडविरुद्ध वनडेत लागोपाठ सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा अय्यरच्या आधी धोनीनेच केल्या होत्या. त्याने तीन वेळा ही कामगिरी 2014च्या दौऱ्यात केली होती.
वनडे क्रिकेटची आकडेवारी पाहिली, तर न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आलेल्या संघामधील खेळाडूंमध्ये सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्यात पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीज राजा अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी लागोपाठ पाच वेळा ही कामगिरी केली. त्यांच्यानंतर अय्यरचा क्रमांक लागतो.
अय्यरला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संधी मिळाली होती, मात्र तो विशेष काही करू शकला नाही. वनडे मालिकेत मात्र त्याने जबरदस्त सुरूवात केली. तसेच त्याची मागील आठ वनडे सामन्यांतील कामगिरी पाहिली तर त्याने सहा वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. अय्यरने मागील आठ वनडे क्रिकेटच्या डावांमध्ये 80, 54, 63, 44, 50, 113*, 28* आणि 80 अशा धावा केल्या आहेत.
A timely fifty from Shreyas Iyer 🙌
Six wickets in hand, eight overs to go – what target will India look to set? 🤔
Watch the #NZvIND ODI series LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺
📝 Scorecard: https://t.co/KsjLsSQ2eQ pic.twitter.com/NIHY39ratT
— ICC (@ICC) November 25, 2022
अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याच्या साथीने पाचव्या विकेटसाठी 77 चेंडूत 94 धावा आणि सहाव्या विकेटसाठी वॉशिंग्टन सुंदर याच्या साथीने 22 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली. Shreyas Iyer Fifty & Most 50+ ODI runs by a player in a team that toured New Zealand
या सामन्यात शिखर धवन याने 72 आणि शुबमन गिल याने 50 धावा केल्या. तसेच सुंदरने 16 चेंडूत झटपट नाबाद 37 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने तीन चौकार आणि तीन षटकार खेचले.
श्रेयस अय्यर न्यूझीलंडमध्ये वनडेत
103 (107), 2020
52 (57), 2020
62 (63), 2020
80 (76), 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटमध्ये शुबमन गिलचा धुमाकूळ! फिफ्टीबरोबरच केला ‘हा’ मोठा रेकॉर्ड नावावर, आकडेवारी पाहाच
NZvIND ODI: धवन-गिलनंतर, अय्यर-सुंदर शो! भारताचे न्यूझीलंडसमोर 307 धावांचे लक्ष्य