एकीकडे भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशविरुद्ध चेन्नईत कसोटी सामना खेळत आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या अनंतपुरमध्ये दुलीप ट्रॉफीचे सामने होत आहेत. या स्पर्धेत श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि आवेश खान सारखे मोठे खेळाडू खेळत आहेत. मात्र या स्पर्धेत अद्याप प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यरची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. तो पुन्हा एकदा फ्लॉप झाला.
दुलीप ट्रॉफी 2024 चा पाचवा सामना इंडिया बी आणि इंडिया डी यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात इंडिया डी संघ प्रथम फलंदाजी करतोय. संघाची सुरुवात चांगली झाली. देवदत्त पडिक्कल आणि श्रीकर भरत यांच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली. पडिक्कलनं 95 चेंडूंत 8 चौकारांच्या मदतीनं 50 धावा केल्या. तर श्रीकर भरतनं 105 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीनं 52 धावांची खेळी केली. रिकी भुईनेही मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली.
मात्र सर्वांना ज्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, तो कर्णधार श्रेयस अय्यर पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. अय्यरनं 5 चेंडूंचा सामना केला आणि खातंही न उघडता बाद झाला. तत्पूर्वी, श्रेयस अय्यर दुसऱ्या सामन्यात देखील शून्यावर बाद झाला होता. यावरून तो किती वाईट फॉर्ममध्ये आहे हे दिसून येतं. यावेळी युवा गोलंदाज राहुल चहरनं त्याला आपला शिकार बनवलं. श्रेयस अय्यरच्या सततच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाच्या अपेक्षांना मोठा फटका बसला आहे.
श्रेयस अय्यर दुलीप ट्रॉफीच्या आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलाय. त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आलेली नाही. त्याच्यासंबंधी नुकतीच एक बातमी समोर आली, ज्यात म्हटलंय की भारतीय निवड समिती त्याच्यावर खूश नाहीत. या खराब कामगिरीनंतर त्याचं पुनरागमन आता आणखी कठीण झालंय.
हेही वाचा –
शून्यावर बाद झालेल्या शुबमन गिलच्या नावे नकोसा रेकॉर्ड, विराट कोहलीचाही लिस्टमध्ये समावेश
18 वर्षाच्या खेळाडूची कमाल, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला!
रोहित शर्माच्या कर्णधार पदाखाली भारतीय कसोटी संघाची कामगिरी