Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 चा ‘टॉपर’ सूर्यकुमार ‘या’ खेळाडूमुळे वनडेत बाकावर? संघातील स्पर्धा ठरतेय कारणीभूत

January 11, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Suryakuamr Yadav Ishan Kishan

Photo Courtesy: Twitter/Screengrab


भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना मंगळवारी (10 जानेवारी) पार पडला. गुवाहाटी येथे खेळला गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघासाठी विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर श्रीलंकेसाठी कर्णधार दसून शनाकाने नाबाद शतक झळकावत एकाकी झुंज दिली. मात्र, या सामन्यात भारतीय संघामध्ये संधी न मिळालेल्या सूर्यकुमार यादव याची चांगली चर्चा झाली.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात नाणेफेकीवेळी आपला संघ जाहीर केला. यामध्ये टी20 क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव याला जागा मिळाली नव्हती. त्याच्या जागी मधल्या फळीत श्रेयस अय्यर व केएल राहुल हे खेळताना दिसले. सूर्यकुमार याला संधी न मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. परंतु, सध्या भारतीय संघातील स्पर्धा पाहतात त्याला पुन्हा बाकावरच बसावे लागण्याची शक्यता आहे.

सध्या भारतीय संघात मधल्या फळीत खेळणारा सूर्यकुमार यादव सातत्याने चांगली कामगिरी करतोय. ‌मागील वर्षी त्याने भारतासाठी सर्वाधिक धावा काढलेल्या. मागील दहा सामन्यात त्याने एक शतक व तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर त्यालाच अधिक संधी मिळेल. तर, पाचव्या क्रमांकावर खेळणारा केएल राहुल हा यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावतोय. त्याचा पर्याय सध्या तरी सूर्यकुमार यादव हा नाही. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये अफलातून कामगिरी केली असली तरी, सूर्यकुमार याला ‌‌‌‌‌‌वनडे संघामध्ये जागा मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

पहिल्य सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, भारताने पहिल्या वनडे सामन्यात मंगळवारी (10 जानेवारी) श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. यामध्ये विराट कोहलीचे शतक, रोहित शर्मा (83) आणि शुबमन गिल (70) यामुळे भारताने 7 विकेट्स गमावत 373 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाकाने नाबाद 108 धावा केल्या, मात्र त्यांना सामना गमवावा लागला.

(Shreyas Iyer Form Is Reason Behind Suryakumar Yadav On Benched In ODI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हद्दच केली! पायात चप्पल घालून शाकिब अल हसन खेळपट्टीवर, पंचांसोबत वाद घातल्यानंतर मोठी कारवाई
पक्की माहिती, पंत नाही खेळणार आयपीएल! सौरव गांगुलींनी केले स्पष्ट 


Next Post
Aleem Dar funny moments

लाईव्ह सामन्यात पाहायला मिळाला पंच अलीम डार यांचा राग, नसीम शाहावर पाय धरण्याची वेळ

Virat Kohli & Sachin Tendulkar

जवळपास अशक्यच! सचिनचा 'हा' विक्रम मोडणे विराटच्या आवाक्याबाहेर, करावी लागेल अविश्वसनीय कामगिरी

Photo Courtesy: Twitter/Jay Shah

विक्रमी 379 धावांची खेळी करूनही समाधानी नाही पृथ्वी, म्हणाला, "संधी होती..."

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143