Shreyas Iyer Statement: आयपीएल 2025 मधील पहिला क्वालिफायर सामना आता थोड्याच वेळात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात सुरू होईल. (RCB vs PBKS Qualifier 1) पंजाबचा संघ 2024 नंतर प्रथमच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. या संघाला टॉप-4 मध्ये पोहोचवण्यात कर्णधार श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. फ्रँचायझीने गेल्या वर्षी मेगा लिलावात श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील केले होते आणि अय्यरने फ्रँचायझीचा हा निर्णय पूर्णपणे योग्य सिद्ध केला आहे.
आरसीबीविरुद्धच्या क्वालिफायर-1 सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरने सांगितले की, यावेळी त्याला पंजाबला ट्रॉफी मिळवून द्यायची आहे आणि त्यांच्या चाहत्यांना जल्लोष करण्याची संधी द्यायची आहे. (Shreyas Iyer said that Punjab Kings want to get a IPL trophy)
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “सुरुवातीपासूनच, जेव्हापासून मला लिलावात निवडले गेले, माझी इच्छा स्पष्ट होती – पंजाबने अजून ट्रॉफी जिंकली नाही आणि माझे ध्येय संघाला पहिल्यांदा ट्रॉफी जिंकण्यात मदत करणे आहे. मला चाहत्यांना अभिमान वाटेल असे काहीतरी करायचे आहे आणि त्यांना जल्लोष करण्याचे कारण द्यायचे आहे, कारण शेवटी, आपण सर्वजण तो प्रतिष्ठित पंजाबी सेलिब्रेशन पाहू इच्छितो.” (Shreyas Iyer said the goal of getting Punjab an IPL trophy was from the beginning)
अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली पंजाब किंग्जने या हंगामात दमदार कामगिरी केली. अय्यर आणि प्रशिक्षक पॉन्टिंग यांनी यापूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली आयपीएल 2019 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाली होती. त्यानंतर दिल्लीचा संघ आयपीएल 2020 मध्ये उपविजेता ठरला. आता हे दोन्ही पंजाब किंग्जमध्ये पुन्हा एकदा एकत्र आहेत, या दोघांच्या जोडीने पंजाबचे नशीब उघडले आहे आणि संघाचे लक्ष पहिल्या आयपीएल विजेतेपदावर केंद्रित झाले आहे. आता संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरेल.






