टीम इंडियाला (team india) जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करायचा आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. रोहित शर्मा (rohit sharma) आणि विराट कोहली (virat kohli) या दोघांच्या अनुपस्थित टीम इंडियासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. तसेच कसोटी संघात (test cricket team) श्रेयस अय्यरची (shreyas iyer) निवड न झाल्याने काही प्रश्न उपस्थित होत आहेत.
श्रेयस अय्यर आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये शानदार पद्धतीने कर्णधारपद देखील भूषवत आहे. तसेच त्याचं व्यक्तिगत प्रदर्शन देखील उत्तम आहे. तरीसुद्धा त्याची कसोटी संघात निवड करण्यात आली नाही. आता श्रेयसची कसोटी संघात निवड न झाल्याने गौतम गंभीर (gautam gambhir) यांची प्रतिक्रिया समोर येत आहे, ज्यामध्ये ते बोलताना निवडकर्त्यांवर निशाणा साधत आहेत.
आताच टीम इंडियाच्या प्रशिक्षकांना (head coach of team india) म्हणजेच गौतम गंभीर यांना जेव्हा श्रेयसची निवड न झाल्याविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले, मी निवडकर्ता नाही. गंभीरच्या या प्रतिक्रियेनंतर आपण अंदाज लावू शकतो की, त्यांनी कुठे ना कुठे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अजित आगरकर यांनी म्हटले होते की, त्याने एकदिवसीय मालिकेत चांगलं प्रदर्शन केलं होतं. घरेलू क्रिकेटमध्ये सुद्धा तो चांगला खेळत होता, पण सध्या कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी कोणतीही जागा नाही.
यावेळेस रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji trophy) सुद्धा श्रेयस अय्यरने शानदार प्रदर्शन केले. त्याने 5 सामन्यात 68.57 च्या सरासरीने 452 धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांचा देखील समावेश होता. याशिवाय विजय हजारे स्पर्धेपासून सय्यद मुस्ताक पर्यंत श्रेयसने शानदार प्रदर्शन केलं, त्याच्या नेतृत्वात संघाने ट्रॉफीवर देखील त्यांचं नाव कोरल.






