भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तो उर्वरित वनडे मालिकेला मुकला होता. तसेच दुखापत गंभीर असल्यामुळे तो आयपीएल २०२१ मधून देखील बाहेर झाला आहे. अशात अय्यरच्या दुखापतीविषयी मोठी माहिती पुढे येत आहे.
येत्या आठवड्यात अय्यरच्या खांद्याची सर्जरी केली जाणार असून त्याला काही महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार असल्याचे समजत आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना अय्यर जखमी झाला होता. इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेयरस्टोच्या शॉटवर डाइव्ह मारत त्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर बराच वेळ तो मैदानावर वेदनेने व्हिवळत होता. अखेर त्याची अवस्था पाहता त्याला मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले होते.
अय्यरच्या दुखापतीवर लक्ष ठेवून असलेल्या एका सूत्राने त्याच्या दुखापतीबद्दल न्यूज एजन्सी पीटीआयला माहिती दिली आहे. “आयपीएल २०२१ ची सुरुवात होण्याच्या एक दिवसआधी अर्थात ८ एप्रिल रोजी अय्यरच्या खांद्याची सर्जरी केली जाणार आहे. त्यामुळे जवळपास ४ महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही,” असे त्यांनी सांगितले आहे.
जर खरोखरच अय्यरला इतके दिवस क्रिकेटपासून दूर राहावे लागले. तर तो २३ जुलैपासून होणाऱ्या इंग्लंडमधील काउंटी टूर्नामेंटला मुकण्याची शक्यता आहे. त्याने या टूर्नामेंटमधील लंकाशायर संघाशी करार केला होता.
श्रेयस अय्यरची दुखापत रिषभ पंतसाठी लाभदायी
दुसरीकडे २६ वर्षीय अय्यरची दुखापत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी फायद्याची ठरली आहे. आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार असलेला अय्यर दुखापतीमुळे आयपीएल २०२१ मधून बाहेर झाला आहे. अशात पंतला दिल्लीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतने आयपीएलमध्ये कोणत्या संघाचे नेतृत्त्व करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
आहा! संजना गणेशनच्या सुंदर फोटोने वाढवला नेटचा पारा, बुमराहने दिली ‘अशी’ रिऍक्शन
पंतने धोनीसारखं बनण्याचा प्रयत्न करू नये; माजी भारतीय यष्टीरक्षकाने दिला सल्ला
पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषकासाठी भारतात येऊ शकतो का? पाहा काय म्हणतेय बीसीसीआय