भारतीय क्रिकेट संघ 2022 वर्षात सर्वाधिक सामने जिंकणारा संघ ठरला. यावर्षी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून भारताच्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण आणि पुनरागमन केले. काहींसाठी हे वर्ष लाभदायक ठरले, तर काहींसाठी निराशाजनक ठरले. विराट कोहलीच्या 71व्या शतकाची आणि जयदेव उनाडकट याच्या संघपुनरागमनाची प्रतिक्षा यावर्षीच संपली. असे होत असताना श्रेयस अय्यर याने भन्नाट विक्रम नोंदवला आहे.
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याच्यासाठी 2022 वर्ष खास ठरले. त्याने भारताकडून तिन्ही प्रकारचे सामने खेळले आणि धावांचा पाऊस पाडत सामनावीरांचे पुरस्कार पटकावले. तो 2022मध्ये कसोटी, वनडे आणि टी20मध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे.
अय्यरने यावर्षी 5 कसोटी सामने खेळताना 60.28च्या सरासरीने 422 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 4 अर्धशतकांचा समावेश आहे. मार्च महिन्यात अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 92 आणि 67 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो सामनावीर ठरला होता. यावर्षी त्याने 17 वनडे सामन्यात खेळताना 55.69च्या सरासरीने 724 धावा केल्या. त्यामध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ही शतकी खेळी रांचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. त्याने त्या दुसऱ्या वनडेत लक्ष्याचा पाठलाग करताना 111 चेंडूत नाबाद 113 धावा केल्या होत्या. यामुळे तो सामनावीर ठरला होता.
अय्यरने 2022 वर्षात भारताकडून 17 टी20 सामनेही खेळले. यामध्ये त्याने 35.61च्या सरासरीने 463 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 4 अर्धशतके केली आहेत. यातील एक खेळी त्याने श्रीलंकेविरुद्ध केली. ज्यामुळे तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने फेब्रुवारी महिन्यात धरमशाला येथे 44 चेंडूत नाबाद 74 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यातही त्याने 45 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या होत्या. त्यामुळे तो सामनावीर ठरला.
(Shreyas Iyer is the only Indian player to win Player of the match award in Test, ODI & T20I in 2022)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भीषण कार अपघातातून बचावलेल्या रिषभ पंतची ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी घेतली भेट
नवीन वर्षात रोहित-राहुलवर प्रश्नांची सरबत्ती! बीसीसीआय ऍक्शन मोडमध्ये