नवी दिल्ली। इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी (8 नोव्हेंबर ) झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. हा सामना जिंकून दिल्लीने आयपीएलच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात या संघाला मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल. या सामन्याबद्दल अय्यरने एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
कर्णधार म्हणून असतात जबाबदाऱ्या
सामन्यानंतर बोलताना श्रेयस म्हणाला की, “आता चांगलं वाटत आहे. हा एक रोलरकास्टर प्रवास राहिला. सामन्यानंतर आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र आलो. प्रत्येक व्यक्तीने केलेल्या प्रयत्नांमुळे मी आनंदी आहे. मला बर्याच गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत. कर्णधार म्हणून बऱ्याच जबाबदाऱ्या असतात.परंतु प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्यांचे मला पाठबळ आहे. यामुळेच हा संघ खूप खास आहे.”
मुंबईविरुद्ध खुलून खेळू अशी अशा- अय्यर
“यासारख्या संघाचा भाग झाल्यामुळे मी खरंच भाग्यवान आहे. भावना सतत बदलत राहतात, म्हणून आपण सामन्याबद्दल एकाच प्रकारे विचार करू शकत नाही. वेळ समोर सरकत असते आणि आपल्यालाही स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे. आशा आहे की पुढील सामन्यातही आम्ही मुंबई इंडियन्सविरूद्ध खुलून खेळू. आम्ही 10 च्या रनरेटने सामन्यात धावा करत होतो. आम्हाला माहित होते की मधल्या षटकात फिरकीपटू रशिद खान घातक ठरू शकेल. त्याला विकेट न देण्याची आमची योजना होती,” असेही पुढे बोलताना अय्यर म्हणाला
…म्हणून स्टॉयनिसला पाठवले सलामीला
हैदराबादविरुद्ध मार्कस स्टॉयनिस सलामीला आला होता.अय्यरने या निर्णयाची प्रशंसा केली. याबद्दल बोलताना अय्यर म्हणाला की, “आमची सलामीची जोडी कमकुवत होती. आम्हाला जलद गतीने डावाची सुरुवात करायची होती. आम्हाला वाटले की जर स्टॉयनिस सलामीला गेला आणि मोठे फटके खेळला, तर तो चांगली सुरुवात देऊ शकेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
योगायोग आलाय जुळून! दिल्ली जिंकणार आयपीएलचे पहिले विजेतेपद?
एकेकाळी रस्त्यावर ट्रॅफिक कंट्रोल करणारा बनला टीम इंडियाचा थ्रो-डाउन विशेषज्ञ
पर्पल कॅप पटकावणाऱ्या रबाडाच्या खात्यात मोठ्या विक्रमाची नोंद, भल्या भल्यांवर ठरला वरचढ