---Advertisement---

श्रेयस अय्यरचा गौप्यस्फोट! टी20 विश्वचषकात स्थान न मिळल्यानंतर व्यक्त केली खंत, बीसीसीआयवर टीका

Shreyas iyer
---Advertisement---

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरनं नुकतेच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चं नेतृत्व करत आयपीएल 2024 चं विजेतेपद पटकावलं. मात्र त्याचा बीसीसीआयच्या वार्षिक करारात समावेश नाही. यामुळे त्याची टी20 विश्वचषकात निवड झाली नाही. याबाबत आता श्रेयस अय्यरनं प्रथमच मौन सोडलं आहे. श्रेयसनं त्याला संघातून का वगळण्यात आलं हे सांगितलं. श्रेयस अय्यरनं शुक्रवारी (7 जून) सांगितलं की, गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, संवादाचा अभाव आणि काही निर्णय त्याच्या बाजूनं न गेल्यामुळे त्याला टी20 विश्वचषक संघात स्थान मिळालं नाही.

मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक सलामीवीर ईशान किशन यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) केंद्रीय करारातून वगळण्यात आलं आहे. अय्यर आणि किशन यांनी देशांतर्गत क्रिकेटला प्राधान्य दिलं नसल्यामुळे त्यांचा बीसीसीआयच्या केंद्रीय करारात समावेश करण्यात आला नाही.

गेल्या वर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात श्रेयस अय्यर चांगल्या फॉर्ममध्ये होता. भारतात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत त्यानं 2 शतकं आणि 5 अर्धशतकांच्या मदतीनं 530 धावा केल्या होत्या, ज्या दरम्यान त्याची सरासरी 66.25 होती. भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.

श्रेयस अय्यरनं त्याच्या यूट्यूब चॅनलवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, “मी वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि त्यानंतर मला काही दिवस विश्रांती घ्यायची होती. संवादाच्या अभावामुळे काही निर्णय माझ्या बाजूने गेले नाहीत. पण शेवटी मी कशी कामगिरी करतो, हे माझ्या हातात आहे. मी ठरवलं होतं की रणजी ट्रॉफी आणि आयपीएल जिंकून मी या सर्व गोष्टींना योग्य उत्तर देऊ शकतो, आणि झालंही तसंच.”

 

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जात असलेल्या टी20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघात श्रेयस अय्यरचा समावेश नाही. श्रेयसचा संघ आयपीएलचं जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला असला तरी स्पर्धेत त्याची फलंदाजी संमिश्र राहिली. बाद फेरीत मात्र त्यानं काही चांगल्या खेळी खेळल्या. याशिवाय त्याच्या नेतृत्व कौशल्याचंही कौतुक झालं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

क्रिझपर्यंत पोहोचूनही धावबाद झाला ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्र प्रीमियर लीगमधील विचित्र घटना; पाहा संपूर्ण VIDEO
न्यूयॉर्कपासून बांग्लादेशपर्यंत! पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद जगभरात साजरा; VIDEO व्हायरल
“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---