आगामी इराणी ट्रॉफी (Irani Trophy) सामन्यात मुंबईचा सामना शेष भारताशी होणार आहे. भारतीय संघाचे सदस्य असलेले श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूरही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनऊ येथे होणाऱ्या या सामन्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आपला संघ जाहीर केलेला नाही. मात्र, अजिंक्य रहाणे मुंबईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने या वर्षाच्या सुरुवातीला विक्रमी 42 वी रणजी ट्रॉफी जिंकली होती. आता संघाच्या नजरा इराणी ट्रॉफी जिंकण्यावर असतील.
शार्दुलचे मुंबईत आगमन झाल्याने संघाची गोलंदाजीबरोबरच फलंदाजीही मजबूत होणार आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर जूनमध्ये घोट्याच्या शस्त्रक्रियेनंतर क्रिकेटपासून दूर आहे. तो नुकताच केएससीए स्पर्धेत सहभागी झाला होता. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याने पाच दिवसीय प्रथमश्रेणी सामन्यासाठी स्वत:ला उपलब्ध करून दिले आहे. एमसीए मंगळवारी संघाची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.
बांगलादेशविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तो सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतण्याचा मार्ग शोधतोय. अय्यर शेष भारताविरुद्धच्या सामन्यातही मुंबईकडून खेळताना दिसणार आहे. अय्यरने 7 ऑगस्ट 2024 रोजी श्रीलंकेविरुद्ध वनडे सामना खेळला होता. हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. नुकत्याच पार पडलेल्या दुलिप ट्रॉफीमध्ये त्याने इंडिया डी संघाचे नेतृत्व केले. आता तो इराणी ट्रॉफीमध्ये स्वत:ला सिद्ध करू इच्छितो.
मुंबईच्या या संघात रहणे व श्रेयस यांच्या व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ हे देखील दिसू शकतात. सध्या भारतीय संघात सामील असलेला सर्फराज खान याला बीसीसीआयने परवानगी दिल्यास तो देखील मुंबई संघाचा भाग बनू शकतो. याव्यतिरिक्त मुशीर खान, तनुष कोटियान व शम्स मुलाणी हे संघाचा भाग असतील.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयासाठी कानपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे संधी, मांजरेकरांची मागणी
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार
IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशला दुसरा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू होणार बाहेर?