भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात पूर्णपणे फेल ठरला आहे. त्याला या सामन्यातील दोन्हीही डावात विशेष खेळी करता आलेल्या नाहीत. तो दोन्ही डावात एकाच प्रकारे बाद झाला आहे. इंग्लंडचे विद्यमान प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम यांनी त्याची कमजोरी हेरली आणि त्याला आपल्या जाळ्यात फसवले.
अय्यर (Shreyas Iyer) पाचव्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये प्रभावी खेळी करू शकला नाही. त्याने पहिल्या डावात ११ चेंडूंत १५ धावांची खेळी केली आणि जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर सॅम बिलिंग्सच्या हाती झेल देत झेलबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावातही मॅथ्यू पॉट्सने जेम्स अँडरसनच्या मदतीने त्याला बाद केले. या डावात त्याने २६ चेंडूंच्या मदतीने १९ धावा फटकावल्या. महत्त्वाचे म्हणजे, अय्यर या दोन्हीही डावात शॉर्ट चेंडूवर (Shreyas Iyer Short Ball Weakness) बाद झाला.
ब्रेंडन मॅक्यूलमची खुणवा खुणव
मागील काही सामन्यांमध्ये अय्यर शॉर्ट चेंडू खेळताना विकेट गमावताना दिसला आहे. आयपीएल २०२२ मध्येही गोलंदाजांनी खासकरून वेगवान गोलंदाजांनी त्याच्या याच कमजोरीला हेरले होते. आयपीएलमध्ये अय्यरच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलम (Coach Brendon McCullum) यांनीही त्याच्या या कमजोरीचा फायदा घेतला. सध्या इंग्लंड संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवत असलेल्या मॅक्यूलम यांनी अय्यर फलंदाजीला आल्यानंतर ड्रेसिंग रूममधून आपल्या गोलंदाजांना खुणवा खुणव करत त्याला शॉर्ट चेंडू टाकायला लावला.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्सने आपल्या प्रशिक्षकांचे म्हणणे ऐकत अय्यरला शॉर्ट चेंडू टाकला आणि त्याच्या अशाच एका शॉर्ट चेंडूवर फटका मारण्याच्या नादात अय्यर अँडरसनच्या हाती झेल देऊन बसला.
मॅक्यूलम यांचे स्टँड्समधून इशारे करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://twitter.com/Benstokesfan55/status/1543912738858012673?s=20&t=nwr446fQF1ilvXIpUH-euA
Fell into the trap 🪤
Scorecard/Clips: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/qLwRAnJs82
— England Cricket (@englandcricket) July 4, 2022
भारतीय संघ बॅकफूटवर
दरम्यान या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४१६ धावा करत सामना आपल्या बाजूने फिरवला होता. या डावात भारताकडून रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा यांनी शतके केली होती. प्रत्युत्तरात जॉनी बेयरस्टोच्या शतकी खेळीमुळे इंग्लंडचा संघ मजबूत स्थितीत होता. मात्र त्याची विकेट गेल्यानंतर इतर फलंदाज विशेष योगदान न देऊ शकल्याने इंग्लंडचा संघ २८४ धावांवरच गुंडाळला गेला.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचे फलंदाज मोठ्या खेळी करू शकले नाहीत आणि २४१ धावाच फलकावर लावल्या. परिणामी इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान मिळाले. मात्र इंग्लंडच्या फलंदाजांनी चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंतच २५९ धावा जोडत संघासाठी विजय सोपा बनवला आहे. आता इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी फक्त ११९ धावा करायच्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऍलेक्स लीसच्या विकेटनंतर दिसले कोहलीचे ‘विराट’ रूप, जल्लोष पाहून अंगात संचारेल उर्जा!!
शतकानंतर अर्धशतक, रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध जाळ अन् धूर संगठच काढला; थेट अव्वलस्थानी पोहोचला