---Advertisement---

शेजारी असावा तर असा! किंग कोहलीला लॉकडाऊनमध्ये डोसा घेऊन आला टीम इंडियातील संघसहकारी

---Advertisement---

मुंबई । भारतीय कर्णधार विराट कोहली इतर क्रिकेटपटूंप्रमाणे आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहे. विराट सध्या त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबईमध्ये आहे. टाळेबंदीच्या या काळात भारताचा धडाकेबाज युवा फलंदाज श्रेयस अय्यर विराटच्या घरी एक खास भेट देण्यासाठी आला होता. विराटने सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे. 

विराटने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये श्रेयस अय्यर आणि विराट कोहली हे दोघेही तोंडाला मास्क लावलेले दिसून येत आहेत. विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझा शेजारी जो माझ्यापासून 500 मीटर दूरवर राहतो. त्याने माझ्यासाठी त्यांच्या घरी बनवलेला नीर डोसा आणला होता. तुझ्या आईचा मी खूप आभारी आहे. आशा करतो, माझ्या घरी बनवलेली बिर्याणी तूम्हाला पसंत पडेल.”

विराटच्या या पोस्टनंतर श्रेयस अय्यरने रिप्लाय देत बिर्याणी चांगली असल्याचे सांगितले. त्यानंतर भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने देखील या फोटोवर एक गमतीशीर कमेंट केली आहे. लिहिले की, “भैया मलापण 1400 किलोमीटर दूर बिर्याणी पाठवून द्या.”

Screengrab: Instagram/Virat Kohli

टाळेबंदी असल्यामुळे विराट कोहली मैदानावर उतरू शकला नाही. मात्र तो आपल्या घरी जिममध्ये व्यायाम करतो. विराटने व्यायाम करतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भारतीय संघ आणि विराट कोहली बरेच दिवस क्रिकेटपासून दूर आहेत.

मार्चनंतर भारतीय संघाने कोणताच आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. बीसीसीआयने खेळाडूंसाठी अजून ट्रेनिंग कॅम्प सुरु केले नाही. दरम्यान, काही खेळाडूंनी इनडोअर आणि आउटडोर ट्रेनिंगला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग घडामोडी – 

फाफ डुप्लेसिसचा खुलासा; जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चर यांच्यामध्ये आहे ही समानता

बंगाल टायगर सौरव गांगुलीने पाहिले होते भूत; फायर ब्रिगेड वाल्यांना बोलवले होते घरी

इंग्लंडचा कर्णधार जो रुटला कन्यारत्न; इंस्टाग्रामवर फोटो केला शेअर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---