भारतीय संघाचा महत्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे शस्त्रक्रियेला सामोरे जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळल्यानंतर श्रेयस अय्यर वनडे मालिकेत मात्र दुखापतीमुळे खेळू शकला नाही. शस्त्रक्रियेसाठी श्रेयस लवकरच लंडनला रवाना होणार असल्याचेही सांगितले गेले. पण ताज्या माहितीनुसार श्रेयस आपली शस्त्रक्रिया लगेच करू इच्छित नाहीये. त्याने स्वतःच हा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये श्रेयसने 4, 12, 0 आणि 26 धावांची खेळी केली. पण तिसऱ्या म्हणजेच अहमदाबाद कसोटीत दुखापतीमुळे त्याला फलंदाजीचा संधी मिळाली नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याची ही दुखापत गंभीर आहे आणि यावर शस्त्रक्रिया देखील करावी लागणार आहे. पण भारताच्या या अनुभवी फलंदाज तत्काळ शस्त्रक्रियेसाठी तयार दिसत नाही. शत्रक्रिया मोठी असल्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने देखील हा निर्णय श्रेयसवर सोपवला आहे.
एनसीएच्या महितीनुसार शस्त्रक्रिया करण्याआधी स्वतः या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न श्रेयस करू इच्छित आहे. अशात आगामी आयपीएल हंगामात देखील श्रेयस खेळताना दिसणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. माहितीनुसार आयपीएल 2023 पेक्षा श्रेयस आगामी वनडे विश्वचषकाला अधिक महत्व देत आहेत. पण जर शस्त्रक्रिया केली, तर त्याला किमान सहा-सात महिने संघातून बाहेर रहावे लागणार आहे. असात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणाऱ्या विश्वचषकातून त्याचे नाव वगळले जाऊ शकते.
दरम्यान, क्रिकबजने मागच्या आठवड्यात या प्रकरणाविषयी महत्वाची माहिती दिली. माहितीनुसार राहुलला मुंबईतील हाडांचे तंज्ञ अभय नेने यांनी श्रेयसला 10 दिवस विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या सल्ल्यानुसार श्रेयस सध्या घरी विश्रांती घेत आहे. अशात येत्या काही दिवसांमध्ये त्याच्या पाठीच्या दुखापतीविषयी येणाऱ्या नवीन महितीवर लक्ष असेल.
(Shreyas Iyer will have to wait for some time for back surgery)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोणाला मिळणार WPL फायनलचे तिकिट! मुंबई-युपीमध्ये रंगणार एलिमिनेटरची लढत
केकेआरला खिंडार! IPL 2023पूर्वी आणखी एका खेळाडूला मोठी दुखापत, आता कसं होणार?