---Advertisement---

Happy New Year: 2023 ला निरोप देत श्रेयस अय्यरने चाहत्यांना नवीन वर्षाच्या दिल्या शुभेच्छा, खास व्हिडिओ केला शेअर

Shreyas-Iyer
---Advertisement---

2023 हे वर्ष सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास होते. यावर्षात आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धा खेळल्या गेल्या, ज्याचा चाहत्यांनी खूप आनंद घेतला. आता नवीन वर्ष सुरू होण्याची चाहत्यांना आणि क्रिकेटरसिकांना प्रतीक्षा आहे. दरम्यान, भारतीय संघाचा स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यर याने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रविवारी (31 डिसेंबर) रोजी यस अय्यर (Shreyas Iyer) याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये अय्यरने 2023 च्या क्रिकेट जगतासोबतच्या त्याच्या काही वैयक्तिक क्षणांच्या क्लिप आणि फोटो दाखवले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानी लिहिले, “2023 ची आठवण करून त्यावर चिंतन करणे, किती आनंददायी प्रवास होता. 2024 मी तुला लवकरच भेटेन. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.”

29 वर्षीय श्रेयस अय्यरची 2023 मधील कामगिरी उत्कृष्ट होती. या वर्षी तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सहाव्या क्रमांकावर होता. अय्यरने तिन्ही फॉरमॅटमध्ये 26 सामने खेळले, ज्यात त्याने 41.08 च्या सरासरीने 986 धावा केल्या. या काळात त्याच्या बॅटमधून तीन शतके आणि पाच अर्धशतकेही झळकली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Iyer (@shreyasiyer96)

श्रेयस अय्यर सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून तो भारतीय संघाच्या कसोटी संघाचा एक भाग आहे. या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये पाहुण्या संघाला एक डाव आणि 32 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अय्यरला त्या सामन्यात विशेष काही करता आले नाही आणि त्याने दोन्ही डावात 37 धावा केल्या. आता दुसरा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान केपटाऊन येथे होणार आहे, ज्यामध्ये अय्यरला नक्कीच चांगली कामगिरी करायची आहे. (Saying goodbye to 2023 Shreyas Iyer shared a special video to wish his fans a Happy New Year)

हेही वाचा

तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर निसटता विजय, दिपेश मोरेला अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार
इंग्लंडच्या माजी कर्णधाराची विराटबद्दल मोठी भविष्यवाणी, म्हणाला, ‘तो 2024 मध्ये सर्वात…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---