भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ ठरला. पण संघाच्या खेळाडूंचे तेवढे कौतुक झाले नाही, जेवढे व्हायला हवे होते. म्हणजेच ही गोष्ट श्रेयस अय्यरची आहे. ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत एकूण 243 धावा केल्या. श्रेयस संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे. गळ्यात मेडल घातल्यानंतर आणि पांढरा कोट भेटलेल्या श्रेयस अय्यरने त्याच्या खेळातील प्रदर्शनाबद्दल भाष्य केले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना श्रेयस अय्यरने त्याच्या भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यावर भाष्य केले. 4 क्रमांक सातत्याने भारतीय संघासाठी अडचण ठरला आहे. हा क्रमांक कोणत्याही संघासाठी महत्त्वाचा असतो. कारण येथे फलंदाजी करणारा फलंदाज पहिल्या तीन फलंदाजांची चुकीची खेळी भरून काढण्याचे काम करतो. तसंच नंतर खेळण्यासाठी येणाऱ्या फलंदाजांवरील दबाव कमी करण्याचे काम करतो.
श्रेयस अय्यर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या दमदार खेळाच्या प्रदर्शनाबद्दल तो म्हणाला, मी पूर्ण उत्साहाने मैदानात खेळण्यासाठी येतो. तसेच तेव्हा मी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही. मला पूर्ण विश्वास असतो की मला जी जबाबदारी भेटली आहे, मी त्याला पूर्ण करेल. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही पाठवा मी माझं ध्येय पूर्ण करूनच परत येईल. हीच माझी मानसिकता असते. नकार आणि अपयश पचवल्यानंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आहे. अपयश तुम्हाला खूप काही शिकवून जाते.
श्रेयस अय्यरने शेवटचा कसोटी सामना 2024 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला होता. कसोटी संघात पुनरागमन केल्याबद्दल तो म्हणाला, मी देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पण आता त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. त्या बद्दल मी काही बोलणार नाही. कारण जर त्याबद्दल मी जास्त विचार केला तर त्याचा मलाच त्रास होईल. मी फक्त वर्तमानात जगतो आणि त्याची मजा घेतो.
हेही वाचा
चॅम्पियन झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या कोचने केला मोठा खुलासा, म्हणाले – 12 वर्षांच्या वयात…
ICC रँकिंगमध्ये भारतीय वर्चस्व! विराट-अय्यरला दमदार खेळाच बक्षीस
केएल राहुलने नाकारले दिल्लीचे कर्णधारपद, अक्षर पटेल सांभाळणार दिल्लीची धुरा?






