---Advertisement---

रोड टू टोकियो! भारताच्या ‘या’ दोन जलतरणपटूंनी मिळवली ऑलिंपिकची पात्रता

On: बुधवार, जून 30, 2021 6:18 PM
---Advertisement---

जुलै महिन्यात टोकियो ऑलिंपिकचा थरार रंगणार आहे. सध्या या स्पर्धेसाठी काही खेळाडू पात्रता सिद्ध करत अंतिम तयारीला लागले आहेत. नुकतेच भारतीय जलतरणपटू श्रीहरी नटराजन आणि साजन प्रकाश हे दोघेही टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी अधिकृतरीत्या पात्र ठरले आहेत. जागतिक जलतरण संघाने रोम येथे झालेल्या सेटे कॉली ट्रॉफी स्पर्धेतील १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतील त्याच्या कामगिरीला ‘अ’ पात्रता दिली आहे.

भारतीय जलतरण महासंघ (एफएसआय) ने ट्विट करत म्हटले की,”श्रीहरी नटराजने ऑलिम्पिक पात्रतेसाठी सेते कोली करंडक स्पर्धेत ५३.७७ सेकंद वेळ घेतला. श्रीहरी साजन प्रकाशसह ऑलिंपिक अ पात्रतेत समाविष्ट झाला आहे. ”

रविवारी (२७ जून ) नटराजने केलेली ही कामगिरी देखील एक राष्ट्रीय पातळीवरील विक्रम आहे, जो टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्यासाठी ५३.७७ सेकंदाच्या कालावधीत ‘अ’ गुण मिळविण्यास पुरेसा होता.(Shrihari Natrajan and saajan prakash qualify for Tokyo Olympics)

वेळेच्या चाचण्यांमध्ये, जलतरणपटू इतर प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करत नाहीत, परंतु त्यांना वेळ सुधारण्याची संधी दिली जाते. टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र झाल्याने दोन भारतीय जलतरणपटू पहिल्यांदाच ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होताना दिसतील.

याच स्पर्धेत साजन प्रकाशने पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत अ मानक मोडला होता. नटराजनची ही पहिली ऑलिंपिक स्पर्धा असेल, तर प्रकाश २०१६ रियो ऑलिंपिकनंतर तो दुसऱ्यांदा भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

ब्रॅड हॉगने निवडला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा सर्वोत्तम संघ, कोहलीला वगळून ‘या’ भारतीय खेळाडूंना स्थान

विराटच्या नेतृत्वात संपेल ‘या’ वेगवान गोलंदाजाची कारकीर्द, गेल्या ३ वर्षात खेळायला मिळाले मोजकेच सामने

वाढदिवस विशेष: एका रात्रीत जयसूर्याला सलामीवीर बनवण्याचा निर्णय झाला अन् पुढे इतिहास घडला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---