इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ची २९ मे रोजी सांगता झाली. यंदाच्या वर्षी नव्याने सामील झालेल्या गुजरात टायटन्सच्या संघाने विजेतेपदाचा बहुमान पटकवला. या आयपीएलमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाला धूळ चारत गुजरातने जेतेपदावर आपले नाव कोरले. मात्र, आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरत असताना गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल याने एक अनोखा विक्रम रचला. जो आजवर आयपीएलच्या १५ हंगामांमध्ये कोणालाही शक्य झाला नाही.
आयपीएल २०२२ला सुरुवात झाली, तेव्हा गुजरातच्या पहिल्याच सामन्यात शुबमन गिल (Shubhman Gill) याला एकही धाव काढता आली नाही. मात्र, त्यानंतर त्याने अनेक सामन्यांत आपली चमक दाखवली. प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांनी शुबमनवर वेळोवेळी विश्वास टाकला. शुबमनने पूर्ण विश्वास आयपीएलच्या अंतिम सामन्यात खरा ठरवला. शुबमनने अंतिम सामन्यांत ४३ चेंडूत नाबाद ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
शुबमनने केलेल्या ४५ धावांमध्ये ३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. शुबमनने मारलेला एक षटकार हा सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर (१८.१ षटक) मारलेला होता. ज्या षटकाराच्या मदतीने गुजरातने सामना आणि आयपीएल २०२२चा चषक आपल्या नावे केला. मात्र, शुबमनने हा षटकार मारत एक विक्रम रचला आहे. आयपीएलच्या अंतिम सामन्यात षटकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून देणारा शुबमन हा आत्तापर्यंत एकमेव खेळाडू आहे. याआधी खुद्द एमएस धोनी, कायरन पोलार्डसारखे खेळाडू देखील आयपीएलमध्ये असा कारनामा करू शकले नाहीत.
Number 7️⃣ jersey
Finishing with a 6️⃣
Gary and Nehraji celebrating 💙
Beating Sanga and Malinga's team 👊🏽Where have we seen this before? 😉 pic.twitter.com/lF8mHajQLw
— Gujarat Titans (@gujarat_titans) May 29, 2022
दरम्यान, शुबमनने केलेला हा कारनामा थेट २०११ साली झालेल्या विश्वचषकाची आठवण करून देणारा होता. २०११ सालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा कर्णदार महेंद्रसिंह धोनी याने श्रीलंकेविरुद्ध गोलंदाज कुशल परेरा याला षटकार लगावत २८ वर्षांनंतर विश्वचषक भारतात आणला होता. भारत विरुद्ध श्रीलंका असा झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आणि आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात असे अनेक योगायोग जुळून आले होते. त्यामुळेच गुजरातच्या संघाने सामना जिंकल्यानंतर “७ नंबरची जर्सी घालून षटकार लगावत आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन यांच्या संघाने कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा यांच्या संघाला मात दिली, यावरून काही आठवतंय का?,” असं ट्वीट करत २०११च्या विश्वचषकाटी आठवण करून दिली.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
गुजरातचे प्रशिक्षक कर्स्टन म्हणातेय, ‘नेहराबरोबर काम करण्याची मजाच वेगळी, तो…’
आयपीएलचा किताब जिंकल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंचे जोरदार सेलिब्रेशन, Photoतून तुम्हीही घ्या आनंद