वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित सामना भारत विरुद्ध पाकिस्तान असा होईल. हा सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअम मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल याचा समावेशा विषयी मोठे वक्तव्य केले.
शुबमन गिल (Shubman Gill) याला डेंग्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या पेशी कमी झाल्यामुळे तो दवाखान्यात दाखल झालेला. त्यामुळे गिल ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या भारताच्या पहिल्या दोन सामन्यातूनही बाहेर पडलेला. आता तो पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी भारतीय संघाशी अहमदाबाद येथे जोडला गेला आहे. अहमदाबाद येथे पोहोचल्यानंतर त्याने गुरुवारी जवळपास एक तास फलंदाजी केली होती. तसेच शुक्रवारी देखील तो संपूर्ण भारतीय संघासोबत सराव करताना दिसून आला.
गिलबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर बोलताना रोहित म्हणाला,
“गिल पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी 99 टक्के फिट आहे. आम्ही अपेक्षा करत आहोत की तो उद्या खेळेल.”
गिल तंदुरुस्त नसल्याने त्याच्या जागी पहिल्या दोन सामन्यांमध्ये ईशान किशन याने रोहित शर्मासह भारतीय संघासाठी सलामी दिलेली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो खातेही न खोलता पहिल्या चेंडूवर बाद झालेला. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी करत रोहितसह शतकी भागीदारी रचलेली. गिल हा वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
(Shubman Gill 99 Percent Fit For Match Against Pakistan Rohit Sharma Clear)
महत्वाच्या बातम्या –
एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अजित भारद्वाजला दुहेरी मुकुट
दुसऱ्या राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेला प्रारंभ, स्पर्धेत राज्यातील सुमारे १५० खेळाडू सहभागी