भारतीय संघाचा युवा स्टार सलामीवीर शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष शानदार ठरत आहे. अशात यामध्ये आणखी भर पडली आहे. ती अशी की, आयसीसीने बुधवारी (दि. 08 नोव्हेंबर) वनडे रँकिंग जाहीर केली. यामध्ये शुबमन गिल नंबर 1 क्रमांकावर विराजमान झाला आहे. गिलने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याची बादशाहत संपवली आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी बाबर अव्वलस्थानी होता, तर शुबमन डेंग्यूमुळे स्पर्धेत उशिरा सामील झाली. एकीकडे शुबमनच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला, तर बाबर धावा करताना संघर्ष करताना दिसला. एवढंच नाही, तर भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज हादेखील वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी कायम आहे.
शुबमन गिल (Shubman Gill) याने श्रीलंकेविरुद्ध 92 धावांची खेळी केली होती. तसेच, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या बॅटमधून 23 धावा निघाल्या होत्या. विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या खेळीने त्याला वनडे रँकिंगमधील (Shubman Gill No 1 ODI Rankings) अव्वलस्थान मिळवून दिले. आता त्याची 830 रेटिंग झाली आहे. तसेच, पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) हा दुसऱ्या स्थानी घसरला असून त्याची रेटिंग 824 झाली आहे.
No.1 team, No.1 players. ???????? pic.twitter.com/t5bWlCjRZQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 8, 2023
टॉप 10मध्ये 3 भारतीय
असे असले, तरीही पहिल्य, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानामध्ये खूपच मोठे अंतर आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक आहे. त्याची 771 रेटिंग आहे. विश्वचषकात धावांचा पाऊस पाडत असलेले भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हेदेखील शुबमनसोबत टॉप 10मध्ये सामील आहेत. विराट चौथ्या स्थानी पोहोचला असून त्याची रेटिंग 770 इतकी आहे. तसेच, रोहित सहाव्या स्थानी आहे. त्याची रेटिंग 739 आहे. पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नर असून त्याची रेटिंग 743 आहे.
भारतीय संघ आणि गोलंदाजांची कमाल
दुसरीकडे, भारतीय संघही 121 रेटिंगसह वनडे रँकिंगमध्ये अव्वलस्थानी कायम आहे. याव्यतिरिक्त फलंदाजांच्या टी20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव अव्वलस्थानी आहे, तर गोलंदाजांच्या वनडे रँकिंगमध्ये मोहम्मद सिराज अव्वलस्थानी आहे. त्याची रेटिंग 709 आहे. तसेच, कसोटी रँकिंगबद्दल बोलायचं झालं, तर गोलंदाजांमध्ये आर अश्विन 879 रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये 455 रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. (shubman gill become no 1 ranked odi batter icc rankings babar azam )
हेही वाचा-
इंग्लंडने पुण्यात जिंकला टॉस, 2 धुरंधरांना दिला डच्चू; पाहा ENG vs NED संघांची Playing XI
मॅक्सवेलची महानता सिद्ध करणारा जबरदस्त रेकॉर्ड, 11 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम