---Advertisement---

मॅक्सवेलची महानता सिद्ध करणारा जबरदस्त रेकॉर्ड, 11 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ पराक्रम

Glenn-Maxwell-Record
---Advertisement---

मंगळवारच्या (दि. 07 नोव्हेंबर) रात्री ग्लेन मॅक्सवेल याने आपल्या झंझावाताने वानखेडे स्टेडिअम दणाणून सोडले. मॅक्सवेलने विश्वचषक 2023 स्पर्धेतील 39व्या सामन्यात अफगाणिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत नाबाद राहून द्विशतक झळकावले. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाचा 3 विकेट्सने दणधणीत विजय झाला. यासह त्यांनी उपांत्य फेरीतही प्रवेश केला. सामन्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स याने मॅक्सवेलची ही ‘वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी’ असल्याचे म्हटले. या सामन्यात 121 चेंडू खेळून मॅक्सवेलच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला आहे. यावरून सिद्ध होते की, मॅक्सवेल किती दिग्गज खेळाडू आहे.

मॅक्सवेलचे द्विशतक
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना इब्राहिम जादरान (129) याच्या शतकाच्या जोरावर 291 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या 292 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया एकेवेळी 7 बाद 95 धावांवर होती. मात्र, तिथून पुढे ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने गोलंदाजांची धुलाई सुरू केली. त्याने या सामन्यात 121 चेंडूंचा सामना करताना नाबाद 201 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 10 षटकार आणि 21 चौकारांचा समावेश होता. ही खेळी करताच मॅक्सवेल हा वनडेत द्विशतक करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि एकूण नववा खेळाडू ठरला.

मॅक्सवेलची खतरनाक आकडेवारी
मॅक्सवेलबाबत एक खतरनाक आकडेवारी समोर येत आहे, ज्यावरून समजते की, तो किती दिग्गज फलंदाज आहे. ही आकडेवारी क्रिकेट सांख्यिकीशास्त्रज्ञ मोहनदास मेनन यांनी एक्सवरून (ट्विटर) सांगितली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “तुम्हाला माहितीये का? जेव्हाही ग्लेन मॅक्सवेल वनडे सामन्यात 65 किंवा त्याहून अधिक चेंडू खेळला आहे, तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ कधीच पराभूत झाला नाही. त्याच्या 11 वर्षे आणि 125 वनडे डावांमध्ये ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा त्याने 100हून अधिक चेंडूंचा सामना केला आहे.”

मॅक्सवेलची कारकीर्द
मॅक्सवेल याच्या वनडे कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत 136 वनडे सामन्यातील 125 डावात 35.71च्या सरासरीने 3892 धावा केल्या आहेत. यामध्ये आजच्या 1 द्विशतक आणि 4 शतकांचा समावेश आहे. तसेच, 23 अर्धशतकांचाही समावेश आहे. (One Freaking Stat About Glenn Maxwell When he bats 65 balls or more in an ODI match, Australia has never lost)

हेही वाचा-
एकच फाईट वातावरण टाईट! मॅड मॅक्सने 201 धावा करताच बनले 5 World Record, मोडणे खूपच कठीण
अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मॅक्सवेलने घातला राडा, नक्की काय घडलं वाचाच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---