---Advertisement---

शतक हुकलं पण शुभमन गिलने ‘हा’ विक्रम करत गावसकरांनाही टाकले मागे

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 12:50 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यातील पाचवा दिवस मंगळवारी खेळला जातोय. त्यामुळे भारतीय संघ आपला दुसरा डाव खेळत आहे. या डावात भारतीय संघाचा युवा सलामी फलंदाज शुबमन गिलने अर्धशतक झळकवले आणि त्याचबरोबर त्याने एक विक्रम ही केला आहे. तो चौथ्या डावात अर्धशतक शतक ठोकणारा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने सुनील गावसकर यांचा विक्रम मोडला आहे.

या सामन्यात पाचव्या दिवशी मंगळवारी(19 जानेवारी) जेव्हा शुबमन गिलने जोश हेझलवूडच्या चेंडूवर वाईडकवर शॉट खेळत दोन धावा घेतल्या आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. तेव्हा त्याचे वय 21 वर्ष 129 दिवस आहे. त्याच्या अगोदर भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांच्या नावावर सर्वात कमी वयात अर्धशतक करण्याचा विक्रम होता. त्यांनी 1970-71 साली वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पदार्पण करताना पोर्ट ऑफ़ स्पेन येथील सामन्यात चौथ्या डावात नाबाद 67 धावांची खेळी केली होती.

शुबमन गिलने मेलबर्न येथे झालेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 45, 25, 50, 31, 7, आणि 91 धावांची खेळी केली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या डावात 146 चेंडूचा सामना करताना 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 91 धावांची खेळी केली. त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक फक्त 9 धावांनी हुकले.

गाबा येथे सुरू असलेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी दुसर्‍या डावात 328 धावांची गरज होती. मात्र या सामन्यात पाचव्या दिवशी रोहित शर्मा 7(21) धावा करू शकला. त्यांनंतर शुबमन गिलने 146 चेंडूत 91 धावांची खेळी केली. त्याचबरोबर कर्णधार अजिंक्य रहाणे आक्रमक खेळी साकारताना 22 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकार ठोकत 24 धावा केल्या. सध्या चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत फलंदाजी करत आहे. हे दोघे अनुक्रमे 56 आणि 34 धावांवर खेळत आहेत. त्यामुळे भारतीय संघाने दुसर्‍या डावात 80.1 षटकात 3 बाद 228 धावा केल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी अजून 100 धावांची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---