आयपीएल 2024 ची तयारी सुरू झाली आहे. या हंगामासाठी मिनी लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. याआधी संघांनी खेळाडूंना रिलीज आणि रिटेन केल्याची यादीही जाहीर केली. हार्दिक पंड्या याने गुजरात टायटन्स संघ सोडला आहे. आता तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. त्याच्या अनुपस्थितीत शुबमन गिल याला गुजरातचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गुजरातचा खेळाडू साई सुदर्शन याने गिलबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
शुबमन गिल (Shubman Gill) गुजरातसाठी चांगला कर्णधार ठरेल, असा विश्वास साई सुदर्शन (Sai Sudarshan) याला आहे. मात्र, तो हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्यापेक्षा चांगला कर्णधार असेल की नाही यावर त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. इंडिया टुडेच्या एका बातमीनुसार, सुदर्शन म्हणाला, “गिल खूप हुशार क्रिकेटर आहे. तो नक्कीच खूप चांगला कर्णधार असेल. गिलसोबत माझे चांगले ट्युनिंग आहे. त्याला पाहून मी एक फलंदाज म्हणून स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतो. शुबमनशी संबंधित अनेक गोष्टी मला आवडतात.
संघातील वातावरणाबाबत तो म्हणाला, खरे सांगायचे तर मला इतक्या संधी मिळतील अशी अपेक्षा नव्हती. आयपीएलमध्ये अनेक तरुण खेळाडू आहेत जे प्रतिभावान आहेत. पण सगळ्यांनाच इतक्या संधी मिळत नाहीत. संघाने मला खेळण्याची संधी दिली, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.
साई सुदर्शनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 13 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 507 धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. साई सुदर्शन याची ९६ ही आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. शुबमन गिलबद्दल बोलायचे झाले तर त्याने आयपीएलमध्ये 91 सामने खेळले आहेत. या कालावधीत 3 शतके आणि 18 अर्धशतकांसह 2790 धावा केल्या आहेत. 129 ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या आहे. (Shubman Gill better captain than Pandya Gujarat Titans player’s big reaction)
महत्वाच्या बातम्या
दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजाची शुबमन गिलबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याला अजून खूप…
आफ्रिका दौऱ्यात भुवनेश्वर कुमारला संघात स्थान न मिळाल्याने भारतीय दिग्गज नाराज; म्हणाला, ‘क्वचितच असा…’