---Advertisement---

Video: युवराज सिंगने शेअर केला इन्स्टाग्राम विरूद्ध रिऍलिटी व्हिडिओ; सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

yuvraj Singh
---Advertisement---

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. युवराज सिंगने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युवराज सिंग गोल्फ खेळताना दिसत आहे. तसेच, या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये युवराज सिंगने इन्स्टाग्राम विरूद्ध रिअॅलिटी व्हिडिओ असे लिहिले आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स या माजी भारतीय क्रिकेटपटूच्या व्हिडिओवर कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.

युवराज सिंग (Yuvraj Singh) याने कसोटी सामन्यांव्यतिरिक्त वनडे आणि टी20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय तो बराच काळ आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये, पंजाब किंग्ज व्यतिरिक्त, युवराज सिंग रायझिंग पुणे सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स सारख्या संघांसाठी खेळला आहे.

युवराज सिंगने भारतासाठी 40 कसोटी सामन्यांमध्ये 33.93 च्या सरासरीने 1900 धावा केल्या आहेत. तर 304 एकदिवसीय सामन्यांमध्ये 87.68 च्या स्ट्राइक रेटने आणि 36.56 च्या सरासरीने 8701 धावा केल्या. तर त्याने 58 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 136.38 च्या स्ट्राइक रेट आणि 28.02 च्या सरासरीने 1177 धावा केल्या आहेत. भारतासाठी युवराज सिंगने कसोटी आणि वनडे फॉरमॅटमध्ये अनुक्रमे 3 आणि 14 शतके झळकावली आहेत. याशिवाय आयपीएलच्या 132 सामन्यांमध्ये युवराज सिंगने 24.77 च्या सरासरीने आणि 129.72 च्या स्ट्राईक रेटने 2750 धावा केल्या आहेत. युवराज सिंगने आयपीएलमध्ये 13 वेळा पन्नास धावांचा टप्पा पार केला. तसेच, युवराज सिंग हा भारतीय संघाचा भाग होता ज्याने 2007 टी20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकला होता. (Video: Yuvraj Singh Shares Reality Video Against Instagram Making noise on social media)

महत्वाच्या बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या माजी दिग्गजाची शुबमन गिलबद्दल लक्षवेधी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘त्याला अजून खूप…’
आफ्रिका दौऱ्यात भुवनेश्वर कुमारला संघात स्थान न मिळाल्याने भारतीय दिग्गज नाराज; म्हणाला, ‘क्वचितच असा…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---