आयपीएल 2025च्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 38 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. सामन्यात गुजरातने ऑलराऊंड कामगिरी केली. पहिल्या डावात खेळताना गुजरात शुबमन गिलच्या 76 धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने 224 धावा केल्या. प्रत्युत्तरात, हैदराबाद संघ निर्धारित 20 षटकात फक्त 186 धावाच करू शकला.
पहिल्या डावात खेळताना गुजरातच्या संघाने अष्टपैलू कामगिरी केली. सलामीवीर शुबमन गिल-साई सुदर्शन यांनी 87 धावांची विस्फोटक भागीदारी केली. ज्यात कर्णधार शुबमन गिलने 38 चेंडूत 76 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 षटकार व 3 चाैकार मारले. त्याच्याशिवाय साई सुदर्शन (48) आणि जोस बटलर (64) यांनी निर्णायक धावा केल्या.
EFFORTLESS SIX!
— Star Sports (@StarSportsIndia) May 2, 2025
Captain #ShubmanGill gets going with a maximum in the very first over!#GT are off to a fiery start! 💥💪
Watch the LIVE action ➡ https://t.co/RucOdyBVUf#IPLonJioStar 👉 #GTvSRH | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi, & JioHotstar! pic.twitter.com/7ImwWz98bm
225 धावांच्या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला अभिषेक शर्माने जलद सुरुवात करून दिली. त्याने केवळ 41 चेंडूत 74 धावा करत 4 चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी केली. मात्र, ट्रॅव्हिस हेड आणि ईशान किशन लवकर बाद झाल्याने दडपण वाढले. पण क्लासेन अपेक्षेप्रमाणे मोठी खेळी करू शकला नाही. सलग विकेट गेल्याने आवश्यक धावगती खूपच वाढली आणि अखेरीस हैदराबादला 38 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.