रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात शनिवारी (३० एप्रिल) आयपीएल २०२२चा ४३ वा सामना खेळवला गेला. या सामन्यात एकवेळ बेंगलोरचे पारडे जड दिसत असताना राहुल तेवतियाने ताबडतोब खेळी करत संघाला ६ विकेट्सने सामना जिंकून दिला. या सामन्यादरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिल याची विकेट जाताना नाट्यमय प्रसंग पाहायला मिळाला.
मैदानी पंचांनी गिलला (Shubman Gill) बाद दिले. परंतु पुढे तिसऱ्या पंचांची मदत घेतल्यानंतर तो नो बॉल (No Ball) असल्याचे दिसले. त्यामुळे हा चेंडू फ्री हिट देण्यात आला. मात्र बेंगलोर संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर नाराज दिसला आणि त्याने मैदानी पंचांना या निर्णयावरून प्रश्नही केले.
बेंगलोरच्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या नवव्या षटकात हा प्रसंग घडला. बेंगलोरकडून शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) हे षटक टाकत होता. त्याच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर गिलने फटका मारला. परंतु चेंडू बॅटच्या बाहेरच्या कडेला लागून यष्टीमागे उभा असलेल्या यष्टीरक्षकाच्या हातात गेली. मैदानी पंचांनी त्वरित या चेंडूवर गिलला बाद करार केले. परंतु त्याने डीआरएस घेतला, ज्यामुळे निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला.
मात्र विराट आणि शाहबाज आश्वस्त होते की, गिल बाद आहे. मात्र तिसऱ्या पंचांनी डीआरएसमध्ये तपासल्यानंतर दिसले की, यष्टीरक्षकाने चेंडू पकडताना त्याचा हात यष्ट्यांच्या थोडा पुढे होता. त्यामुळे पंचांनी गिलला नाबाद दिले. याबरोबर तो चेंडू नो बॉल देत फ्रि हिटही दिला. हे पाहून गोलंदाज शाहबाजचे तोंड पडले. यानंतर विराटही पंचांना या निर्णयाबद्दल विचारपूस करताना दिसला. पुढे गिलने फ्रि हीटवर मिड विकेटच्या वरून शानदार षटकार ठोकला. परंतु याच षटकातील पाचव्या चेंडूवर गिल पायचित झाला. त्याने ३१ धावांवर आपली विकेट गमावली.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.३ षटकातच ४ विकेट्सच्या नुकसानावर बेंगलोरचे लक्ष्य पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
नऊ पैकी ८ सामने जिंकूनही गुजरात टायटन्ससाठी दूर आहे प्लेऑफ, जाणून घ्या गणिते
शमीच्या खिलाडूवृत्तीला सलाम! प्रतिस्पर्धी असूनही अर्धशतक ठोकल्यानंतर विराटला दिल्या शुभेच्छा