---Advertisement---

स्विगीच्या वाईट सेवेवर संतापला शुबमन गिल; जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्ककडेच केली तक्रार

On: शनिवार, एप्रिल 30, 2022 10:05 PM
Shubman-Gill
---Advertisement---

गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. हंगामातील सुरुवातीच्या आठ सामन्यात त्याने २२९ धावांचे योगदान दिले आहे. यादरम्यान त्याने ऑनलाईन खाद्यपदार्थ घरपोच करणारी वेबसाईट ‘स्विगी’विषयी एक मजेशीर ट्वीट केले होते. आता स्विगीकडून देखील शुबमनला प्रत्युत्तर मिळाले आहे.

शुबमन गिलचे मजेशीर ट्वीट
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) याने नुकतेच काही दिवसांपूर्वी ट्विटर (Twitter) खरेदी केले आहे. मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर त्याच्या फिचर्समध्ये काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल (Shubman Gill) याला असे वाटते की, मस्कने ट्विटरपाठोपाठ आता स्विगी (Swiggy) देखील खरेदी केले पाहिजे. गिलने एकप्रकारे स्विगीच्या खराब सेवेवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी (२९ एप्रिल) रात्री ११च्या सुमारास केलेल्या ट्वीटमध्ये गिलने लिहिले की, “एलॉन मस्क कृपया तू स्विगी विकत घे, जेणेकरून त्यांना वेळेत डिलीवरी पोहोच करता येईल.”

https://twitter.com/ShubmanGill/status/1520093399348506625?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1520099119796301824%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fmahasports.glteyepbzg-jqp3vl997450.p.temp-site.link%2Fwp-admin%2Fpost.php%3Fpost%3D207935action%3Dedit

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

स्विगीने दिले असे उत्तर
गिलच्या या मजेशीर आणि खोचक ट्वीटनंतर स्विगीकडून त्याला प्रत्युत्तर मिळाले. ट्वीटवर रिप्लाय करत स्विगीने लिहिले की, “हाय शुबमन, ट्वीटरने करो किंवा न करो, पण आम्ही आमच्या ऑर्डरसह सर्वकाही ठीक आहे, याची खात्री करू इच्छितो. तुमच्या सर्व माहितीसह आम्हाला डायरेक्ट मेसेज करा, आम्ही इतरांपेक्षा लवकर पोहोचू.”

https://twitter.com/SwiggyCares/status/1520099119796301824?s=20&t=Jr5T0dU5tYwUgdqd0IXZ7A

शुबमन आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये गुजरात टायटन्सचे प्रतिनिधित्व करत आहे. यावर्षी त्याचे प्रदर्शन आतापर्यंत चांगले राहिले आहे. चालू हंगामात त्याने अतापर्यंत दोन वेळा अर्धशतकी खेळी केली. शनिवारी (३० एप्रिल) आरसीबीविरुद्धच्या सामन्यात देखील त्याने ३१ धावांचे योगदान दिले. हा सामना गुजरातने ६ विकेट्सने जिंकला आणि प्लेऑफमध्ये जवळपास स्थान पक्के केले. गुजरातने हंगामातील सुरुवातीच्या ९ सामन्यांपैकी फक्त एक सामना गमावला आहे आणि उरलेले ८ सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत संघ १६ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! फुटबॉल विश्वातील ‘सुपर एजंट’ने घेतला जगाचा निरोप, प्रसिद्ध खेळाडूंचे केले होते प्रतिनिधित्व

तेवतिया बनला बेंगलोरचा काळ! कोहली- पाटीदारची फिफ्टी व्यर्थ, ६ विकेट्सने विजय मिळवत गुजरात पुन्हा ‘टॉपर’

विराटच्या हंगामातील पहिल्या फिफ्टीनंतर पत्नी अनुष्काचा आनंद गगनात मावेना; स्टेडिअममध्ये केला तुफान जल्लोष

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---