एकाना स्टेडियम, लखनऊ येथे आज (बुधवार, १७ जून) भारत विरुद्ध अफगाणिस्तान दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. यामध्ये शुबमन गिलने भारतीय कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने १५४ धावांची ऐतिहासिक खेळी करत एका विशेष यादीत प्रवेश केला आहे. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील नववे, वनडे कर्णधार म्हणून पहिले, भारताचा कर्णधार म्हणून सातवे आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २१ वे शतक ठरले आहे.
गिलने ही उल्लेखनीय खेळी करताच वनडेमध्ये भारतासाठी कर्णधार म्हणून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणाऱ्या पहिल्या दहामध्ये प्रवेश केला आहे. या यादीत वीरेंद्र सेहवाग पहिल्या स्थानावर आहे, तो वनडेमध्ये केवळ भारतासाठीच नाही तर जगातील सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारा कर्णधार आहे. त्याने २०११ मध्ये इंदौरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात भारताचे नेतृत्व करताना १४९ चेंडूंत २१९ धावांची खेळी केली होती.
तसेच सेहवागशिवाय भारताचा कर्णधार म्हणून वनडेमध्ये द्विशतक केवळ रोहित शर्माने केले आहे. त्याने १३ डिसेंबर २०१७ मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध २०८ धावांची खेळी केली होती.
वनडे सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारे भारतीय –
१) २१९ – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध वेस्ट इंडीज
२) २०८ – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका
३) १८६ – सचिन तेंडुलकर विरुद्ध न्यूझीलंड
४) १७५ – कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे
५) १६० – विराट कोहली विरुद्ध दक्षिण आफ्रिका
६) १५७ – विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज
८) १५४ – शुबमन गिल विरुद्ध अफगाणिस्तान
९) १५० – मोहम्मद अझरुद्दीन विरुद्ध झिम्बाब्वे
सामन्याची स्थिती पाहिली तर, ईशान किशनने ७१ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने शेवटच्या ५० धावा केवळ १९ चेंडूंतच केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २२४ (१४०) धावांची भागीदारी केली. भारताने ४९.५ षटकांत सर्व विकेट्स गमावत ४०२ धावसंख्या उभारली.






