शुबमन गिल हा तिन्ही फॉरमॅट खेळणाऱ्या भारताच्या फलंदाजांपैकी एक आहे. सध्या अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत गिलही भारतीय संघाचा एक भाग आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गिलचा समावेश होता, मात्र तो केवळ 12 चेंडूत 23 धावा करून बाद झाला. आता माजी भारतीय खेळाडू रोहन गावसकर म्हणाले की, गिल भारतीय टी20 संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बसत नाही.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारताच्या विजयानंतर क्रिकबझशी बोलताना रोहन गावसकर (Rohan Gavaskar) म्हणाले, “शुबमन गिल (Shubman Gill) हा साहजिकच दर्जेदार खेळाडू आहे. पण सध्या तरी यशस्वी जयसवाल सलामीली खेळेल. किंवा विराट कोहली आल्यावर तो खेळेल. मला असे वाटते की, सध्या गिलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणे कठीण आहे.” (shubman gill find hard to fit in indian cricket team t20i playing xi rohan gavaskar)
याशिवाय गावसकरांनी यावर्षी खेळल्या जाणार्या टी20 विश्वचषकाबद्दल आणि भारतीय संघात कोणते तीन खेळाडू असावेत याबद्दल सांगितले. “माझ्यासाठी सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग आणि यशस्वी जयसवाल हे तीन खेळाडू असावेत. मी फक्त संघासाठी विचारत करत नाही, तर प्लेइंग इलेव्हनसाठी विचारत करत आहे.” आता निवडकर्ते कोणत्या खेळाडूंना टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
गिलने जानेवारी 2023 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हापासून तो 14 टी20 सामने खेळला आहे, 14 डावात फलंदाजी करत त्याने 25.76 च्या सरासरीने आणि 147.57 च्या स्ट्राइक रेटने 335 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. (Shubman Gill does not fit in India’s playing eleven Gavaskar’s sensational claim)
हेही वाचा
ठरलं! ‘दादा’ची बायोपिक येणार; ‘हा’ सुपरस्टार साकारणार मुख्य पात्राची भूमिका
BREAKING! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी Team India घोषित; तीन यष्टीरक्षकांना संधी, पण महत्वाचा गोलंदाज बाहेर