---Advertisement---

स्टीव्ह स्मिथला स्लेजिंग करून डेव्हिड वॉर्नरला मिळालं मोठं यश, पाहा कसा पाठवला पॅव्हेलियनमध्ये

David-Warner-Steve-Smith-Sledging
---Advertisement---

BBL: सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. या लीगमध्ये चाहत्यांना दररोज आणखी रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेत शुक्रवारी (12 जानेवारी) सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सने 19 धावांनी सामना जिंकला. सामना सुरू होताच सिडनी थंडरचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर सिडनी सिक्सर्सचा फलंदाज आणि त्याचा मित्र स्टीव्ह स्मिथ याची स्लेजिंग करताना दिसला.

या सामन्यात स्टीव्ह स्मिथ सिडनी सिक्सर्सचा सलामीवीर म्हणून आला होता. त्याला क्रीझवर येताना पाहून डेव्हिड वॉर्नर त्याच्याकडे गेला आणि त्याला योग्य प्रकारे क्रिजवर मार्क करण्याचा सल्ला देताना दिसला. वॉर्नर स्मिथकडे जात म्हणाला स्मिथचे लक्ष कोणीही विचलित करू शकत नाही. वॉर्नरच्या बोलण्याने स्मिथचे लक्ष विचलित झाले आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो गोल्डन डकचा बळी ठरला. अशाप्रकारे डेव्हिड वॉर्नरची स्लेज त्याच्या संघासाठी खूप फायदेशीर ठरली. (bbl 2024 david warner sledge got steve smith golden duck)

आता डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथ यांच्यातील या क्षणाचा व्हिडिओ बिग बॅश लीगने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघेही खूप चांगले मित्र आहेत. दोघेही ऑस्ट्रेलियासाठी दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहेत.

डेव्हिड वॉर्नरने नुकतीच कसोटी आणि एकदिवसीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध सिडनी येथे खेळला. शेवटच्या कसोटीनंतर पहिल्यांदाच डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे दोघे बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसले. (David Warner’s big hit by sledging Steve Smith see how he was sent to the pavilion)

हेही वाचा

‘शुबमन गिल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बसत नाही’, गावसकरांचा खळबळजनक दावा
दक्षिण आफ्रिका संघात मोठी खळबळ, विश्वचषकापूर्वीच केली कर्णधाराची हकालपट्टी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---