Ishan Kishan Viral Video: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताने नुकताच संघ जाहीर केला आहे. ध्रुव जुरेल यालाही या संघात संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाने पुन्हा एकदा इशान किशन याच्याकडे दुर्लक्ष केले आहे. इशान किशनसोबतच मोहम्मद शमी यालाही भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. कसोटी संघ जाहीर होण्यापूर्वी ईशानने एक व्हिडिओ शेअर केला होता. यावर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मुख्य प्रशिक्षक द्रविड यांच्या वक्तव्यानंतर ईशानची ही पहिली सोशल मीडिया पोस्ट आहे.
इशान किशन (Ishan Kishan) याने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला तो ध्यान आणि प्राणायाम करताना दिसत आहे. यानंतर तो बूट घालून धावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो अनेक प्रकारची ट्रेनिंग घेताना दिसत आहे. काही लोकांनी इशान किशनला त्याच्या व्हिडिओवरून ट्रोल केले आहे. तर बहुतेक चाहत्यांनी ईशान किशनला शुभेच्छा दिल्या आहेत. इशानचा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. (ishan kishan shared training video on social media after rahul dravid statement team india)
🏃♂️ pic.twitter.com/XjUfL18Ydc
— Ishan Kishan (@ishankishan51) January 12, 2024
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी20 मालिकेसाठी ईशानला संघात स्थान मिळाले नाही. यानंतर त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या बातम्या पाहायला मिळाल्या. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी इशानवर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, “ईशाननेच ब्रेक मागितला होता. तो जेव्हाही उपलब्ध असेल तेव्हा त्याला संघात निश्चितपणे समाविष्ट केले जाईल.” पण इशान किशनचा व्हिडिओ पाहता त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसतंय. मात्र, याबाबत कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यातच इंग्लंड विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठीही त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली नाही. (Ishan Kishan’s first social media post after Dravid’s reaction see what the video hints at)
हेही वाचा
स्टीव्ह स्मिथला स्लेजिंग करून डेव्हिड वॉर्नरला मिळालं मोठं यश, पाहा कसा पाठवला पॅव्हेलियनमध्ये
‘शुबमन गिल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बसत नाही’, गावसकरांचा खळबळजनक दावा