भारताने 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. ध्रुव जुरेल याचा यात समावेश करण्यात आला आहे. ध्रुवचा देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळतो. 23 वर्षांचा ध्रुव उत्तर प्रदेशकडून खेळला आहे. एका रिपोर्टनुसार ध्रुवने सैनिक व्हावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण त्याने क्रिकेटची निवड केली.
बीसीसीआयने शुक्रवारी (12 जानेवारी) रात्री भारतीय संघाची घोषणा केली. त्यात अनेक मोठ्या खेळाडूंची नावे नव्हती. पण एका नावाने सर्वांनाच चकित केले. ते नाव होते ध्रुव जुरेल (Dhruva Jurel). ध्रुवने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे घरच्या मैदानावर होणाऱ्या मालिकेसाठी त्याला संधी मिळाली.भारतीय संघाने इशान किशन याला वगळले आहे. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यालाही संघात स्थान मिळवू शकले नाही. (dhruv jurel selected for team india for test series against england)
ध्रुवचे वडील नीम सिंह जुरेल सैन्यात कार्यरत होते. ते कारगिल युद्धही लढले आहेत. ध्रुवच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने नॅशनल डिफेन्स एकॅडमीत जाऊन सैनिक बनून देशाची सेवा करावी. पण ध्रुवने क्रिकेटची निवड केली. या निर्णयावर ध्रुवच्या घरी कोणाचाही आक्षेप नव्हता. नेम सिंह सांगतात की, हे वेगळे क्षेत्र आहे. इथे राहूनही देशाची सेवा करता येते.
Dhruv Jurel (wk), we’ll be there 🇮🇳💗 pic.twitter.com/bM6XopD9Pq
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) January 12, 2024
ध्रुवने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 19 डावांमध्ये 790 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने एक शतक आणि 5 अर्धशतके केली आहेत. त्याने लिस्ट ए चे 10 सामने खेळले आहेत. यामध्ये 2 अर्धशतके झळकावली आहेत. (Dhruv Jurel’s selection in India’s Test team see how the son of an army officer became a cricketer)
हेही वाचा
स्टीव्ह स्मिथला स्लेजिंग करून डेव्हिड वॉर्नरला मिळालं मोठं यश, पाहा कसा पाठवला पॅव्हेलियनमध्ये
‘शुबमन गिल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बसत नाही’, गावसकरांचा खळबळजनक दावा