भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साउथम्पटन येथील रोज बाऊल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याचा मंगळवारी (२२ जून) पाचवा दिवस असून, या अखेरच्या दिवसाच्या खेळाला पावसामुळे १ तास उशीराने म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४ वाजता सामना सुरुवात झाली. पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताला रॉस टेलरच्या रूपाने पहिले यश मिळवून देताना शुबमन गिलने एक अप्रतिम झेल टिपला.
न्यूझीलंडची सावध सुरुवात
तिसर्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव २ बाद १०१ धावांवर थांबला होता. कर्णधार केन विलियम्सन १२ व रॉस टेलर ० धावांवर नाबाद होते. पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला या दोघांनी सावध पवित्रा स्वीकारला. ड्रिंक्सपर्यत १४ षटके खेळून काढताना या दोघांनी केवळ १६ धावांची भर घातली.
ड्रिंक्सनंतर, मोहम्मद शमी पहिले षटक टाकण्यासाठी आला. स्ट्राईकवर असलेल्या रॉस टेलरने पुढे पडलेला चेंडू टेलरने लॉंग ऑफच्या दिशेने काहीसा हवेतून टोलवला. मात्र, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये उभ्या असलेल्या शुबमन गिलने उजव्या बाजूला झेपावत हवेमध्ये सुर मारत नेत्रदीपक झेल टिपला. त्याच्या या झेलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.
https://twitter.com/ComeonPant/status/1407305626024251399
What a catch shubman 🔥🔥
Kiwis are on backfoot#NZvIND #ICCWTCFinal #worldtestchampionshipfinal #Shubmangill #Gill #Kohli #indvsnz #indvsnz pic.twitter.com/mx7zz9y5yf— Himanshu (@himanshu2782005) June 22, 2021
चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
ट्विटरवर एका चाहत्याने या झेलाचे छायाचित्र ट्विट करताना लिहिले, ‘हा सुपरमॅन नाही..शुब-मॅन आहे’. अन्य एका चाहत्याने त्याची तुलना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत करताना लिहीले, ‘जसा गुरु तसा शिष्य’ अन्य देखील काही चाहत्यांनी त्याच्या या छायाचित्रांचे कौतुक करताना विविध विशेषणांचा वापर केला आहे.
It’s not Super-Man, its Shub-Man 🌟#WTC21Final #ShubmanGill pic.twitter.com/tgTFITjfxN
— sohom (@AwaaraHoon) June 22, 2021
Like master Like apprentice#Kohli #Shubmangill pic.twitter.com/3d3hj4yZrd
— Sonu #SackFaf (@80intltons) June 22, 2021
भारतीय संघाचे पहिल्या सत्रावर वर्चस्व
पाचव्या दिवशीचे पहिले सत्र संपेपर्यंत न्यूझीलडने ७२ षटकात ५ बाद १३५ धावा झाल्या आहेत. विलियम्सन १९ धावांवर नाबाद आहे, तर कॉलिन डी ग्रँडहोम ० धावांवर नाबाद आहे. या निर्णायक दिवशी न्यूझीलंडने पहिल्या सत्रात रॉस टेलर (११ धावा), हेन्री निकोल्स (७ धावा) व बीजे वॉटलींग (१ धावा) यांचे बळी गमावले. भारतातर्फे मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले आहेत. तर, एक बळी रविचंद्रन अश्विन याला मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC फायनल: पहिल्या षटकानंतर बुमराहला बदलावी लागली जर्सी, हे होते कारण
रोनाल्डोने कोको-कोलाच्या बॉटल हटवल्याच्या व्हिडिओवर करिना कपूरची ‘भन्नाट’ रिऍक्शन
स्टायलिश कॅप्टन कूल! पाहा धोनीच्या दहा हटके हेअरस्टाईल