भारतीय क्रिकेट संघाचा स्टार युवा फलंदाज शुबमन गिल सध्या मायदेशात कसोटी मालिका खेळत आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. शुबमन गिल याने मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार खेळी करत शतक ठोकले. मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात देखील गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा चाहत्यांना आहे. पण त्याआधी भारतीय युवा फलंदाजाबाबत एक महत्वाची बामती समोर येत आहे.
भारतातील आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांनी घरातून बाहेर पडून मतदान करणे लोकशाहीसाठी खूप गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असते. असाच एक प्रयत्न शुबमन गिल (Shubman Gill) याला सोबत घेऊन निवडणूक आयोगाकडून केला जात आहे. पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी सिबिन सी यांनी शुबमन गिल याला राज्यासाठी ‘आयकॉन’ (प्रचारक) बनवले आहे.
पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी सिबिन सी यांनी समोवारी (19 फेब्रुवारी) असे सांगितले की, गिल वेगवेगळ्या मोहिमांचा भाग बनेल. या मोहिमा मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी आणि जणजागृती करण्यासाठी असतील. यामुळे आपण यावेळी 70 टक्के मतदानाचा टप्पा पार करू शकतो. निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘इर बार 70 पार’ अले लक्ष्य ठेवले आहे.
पंजाबमध्ये मागच्या लोकसभा निवडणुकीत (2019) 13 जागांसाठी 65.96 टक्के मतदान झाले होते. निवडणूक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गिल क्रीडाप्रेमी आणि विशेषतः युवा वर्गामध्ये लोकप्रिय आहे. याच कारणास्तव त्याला निवडणुकीचा चेहरा बनवले गेले आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर गिलच्या खांद्यांवर नवी जबाबदारी पडली आहे. पण गिल सध्या संघासोबत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांनंतर भारतीय संघ 2-1 अशा आघाडीवर आहे. शेवटच्या तीन सामन्यांमध्ये गिलने 252 धावा केल्या आहेत. (Shubman Gill has a big responsibility for the Lok Sabha elections, the young batsman will be seen in a new role)
महत्वाच्या बातम्या –
मलिंगावर वरचढ ठरला वानिंदू हसरंगा! बनला अशी कामगिरी करणारा पहिला श्रीलंकन
Ranji Trophy 2024 । उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक जाहीर, एका क्लीकवर मिळवा सर्व अपडेट