शुबमन गिल 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. गिलने रविवारी (24 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात गिलने आपले सहावे वनडे शतक ठोकले. त्यातही चालू वर्षातील हे त्याचे पाचवे शतक होते. भारतासाठी एका वर्षात पाच शतक करणारा गिल सातवा खेळाडू ठरला आहे. सर्वप्रथम अशी कामगिरी सचिन तेंडुलकर याने 1996 रोजी केली होती.
भारतासाठी सर्वाधिक वेळा एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा जास्त शतक करण्याच्या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने कारकिर्दीत चार वेळा वर्षात पाच विंका त्यापेक्षा जास्त वनडे शतके केली आहेत. यादीत दुसरा क्रमांक रोहित शर्मा याचा आहे, ज्याने तीन वेळा अशी कामगीर केली आहे. सचिनने कारकिर्दीत दोन वेळा वर्षात पाच किंवात त्यापेक्षा जास्त शतके ठोकली होती. राहुल द्रविड याचे नाव यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. द्रविडला एकदाच ही कामगिरी करता आली. सौरव गांगुली, शिखर धवन आणि शुबमन गिल यांची नावे अनुक्रमे पाच, सहा आणि सात क्रमांकावर आहेत. (Shubman Gill has become the seventh batsman for India to score five ODI centuries in a year)
एका वर्षात पाच किंवा त्यापेक्षा जास्त वनडे शतके करणारे भारतीय फंलंदाज
विराट कोहली (2012, 2017, 2018, 2019)
रोहित शर्मा (2017, 2018, 2019)
सचिन तेंडुलकर (1996, 1998)
राहुल द्रविड (1999)
सौरव गांगुली (2000)
शिखर धवन (2013)
शुबमन गिल (2023)
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्यूशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन
महत्वाच्या बातम्या –
शुबमनची बॅट तळपली! अवघ्या 9 दिवसात झळकावलं दुसरं झंझावाती शतक
विश्वचषकात श्रीलंकेचं सगळंच अवघड! स्टार खेळाडूचा पत्ता होऊ शकतो कट, Asia Cup 2023लाही मुकलेला