टी20 विश्वचषक 2024 साठी सलामीवीर शुबमन गिलचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. तो भारतीय संघासोबत अमेरिकेलाही गेला होता. मात्र, न्यूयॉर्कमधील सामने संपल्यानंतर टीम मॅनेजमेंटनं त्याला भारतात परत पाठवलं. याशिवाय शुबमन गिलनं इंस्टाग्रामला रोहित शर्माला अनफाॅलो केलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. परंतु गिलनं इंस्टाग्रामला एक स्टोरी शेअर करुन या अफवांना शांत केलं. शुबमन गिलनं रोहित शर्मासोबतचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीला ठेवला आहे.
2024 च्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा शुबमन गिल, रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद यांचा संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, न्यूयॉर्कमधील सामने संपल्यानंतर गिल आणि आवेश खानला भारतात परत पाठवण्यात आलं, गिल त्याचा जास्तीत जास्त वेळ साईड बिझनेसचं नियोजन करण्यातच घालवत होता. ‘क्रिकेट वन’च्या वृत्तानुसार, गिलवर अनुशासनहीनतेमुळे ही कारवाई करण्यात आली.
तो जेव्हापासून अमेरिकेला गेला, तेव्हापासून तो भारतीय संघासोबत फिरलेला नव्हता. त्याला टीमसोबत राहण्यात काही रस दिसत नव्हता. तो आपला जास्तीत जास्त वेळ साईड बिझनेसचं नियोजन करण्यातच घालवत होता. तसेच भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान खलील अहमद, आवेश खान आणि रिंकू सिंह हे टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते, मात्र शुबमन गिल तेथे दिसला नव्हता.
त्यामुळे सर्वत्र अफवा सुरु होत्या की गिलची संघात निवड न झाल्यानं तो भारतीय संघासोबत जास्त फिरत नव्हता. परंतु शुबमन गिलनं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यावर पुन्हा चर्चांना उधाण आलं की, गिल रोहित शर्मावर नाराज आहे. परंतु गिलनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला रोहित शर्मासोबत एक फोटो शेअर केला आणि सर्व अफवांना उत्तर दिलं.
महत्त्वाच्या बातम्या-
‘रिटायर्ड हर्ट’ आणि ‘रिटायर्ड आऊट’ यात फरक काय? नामिबियाच्या कर्णधाराच्या नावावर विश्वविक्रम का नोंदला गेला?
टी20 विश्वचषकाच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, नामिबियाच्या कर्णधाराचं नावं रेकॉर्ड बुकमध्ये नोंदल्या गेलं
गतविजेती इंग्लंडची टीम जशीतशी सुपर 8 साठी पात्र, पुढील वाटचाल मात्र अवघड; जाणून घ्या