भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सलामीला फलंदाजीला आलेल्या युवा शुबमन गिल याने आपला लाजवाब फॉर्म कायम राखला. श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात शतक झळकावलेल्या गिलने या सामन्यात आणखी एक मोठा पराक्रम करत द्विशतक साजरे केले. वनडे क्रिकेटमध्ये 200 धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला.
A hat-trick of sixes to get to his double hundred ⭐
Shubman Gill becomes the fifth Indian player to get to an ODI double ton 🤩#INDvNZ | 📝: https://t.co/raJtMjMaEn pic.twitter.com/UNSRQK11Rt
— ICC (@ICC) January 18, 2023
रोहित शर्मा याच्यासह सलामीला आलेल्या शुबमन गिलने सुरुवातीपासून आक्रमक फलंदाजी केली. त्याने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवले. त्याने 87 चेंडूवर शतकाला गवसणी घातली. त्यानंतर त्याने आपल्या खेळात अधिक आक्रमण आणत 145 चेंडूंवर द्विशतक पूर्ण केले. यामध्ये 19 चौकार व 8 षटकारांचा समावेश होता. द्विशतकानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. तो 208 धावांवर माघारी परतला.
गिलने याआधी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले होते. तोच फॉर्म कायम राखत त्याने या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढली. त्याने सुरुवातीला रोहित शर्मासह 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सूर्यकुमारसह 65 व हार्दिकसह 74 धावांची भागीदारी त्याने लावली. हार्दिक बाद झाल्यानंतर त्याने डावाची सूत्रे पूर्णपणे स्वतःकडे घेत षटकार चौकारांची बरसात केली. भारतीय डावाच्या 47 व्या षटकात लॉकी फर्ग्युसन याला सलग तीन षटकार ठोकत त्याने आपल्या कारकिर्दीत हा मैलाचा दगड पार केला.
(Shubman Gill Hits Double Century Against Newzealand In ODI)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश
सरफराजने शतक ठोकल्यानंतर ‘सिद्धू मूसेवाला’च्या अंदाजात केले सेलिब्रेशन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध