शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार असून, त्याची सुरूवात 15 ऑगस्टपासून होणार आहे. यासाठी दोन्ही संघांचा सराव जोरात सुरू आहे, मात्र सरावादरम्यान गिलला दुखापत झाल्याचे कळते. त्यामुळे संघाच्या चिंतेत भर पडली आहे.
भारताचा सराव कोलंबोच्या नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब (एनसीसी) मैदानावर सुरू असताना गिलच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली. सामन्याची पूर्वतयारी म्हणून भारत आणि श्रीलंका इलेव्हनमध्ये शुक्रवारपासून (7 ऑगस्ट) तीन दिवसीय सामना खेळला जाणार आहे. आता गिलला दुखापत झाल्याने तणाव वाढला आहे. त्याची ही दुखापत किती गंभीर आणि तो सामन्याला मुकला तर कोण नेतृत्व करणार, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिलची दुखापत गंभीर असल्याचे कळते. तो नेटमध्ये वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजीचा सराव करत होता. तेव्हा त्याला दुखापत झाली आणि त्याला वैद्यकिय सल्ला घ्यावा लागला. तो काही वेळानंतर नेटमध्ये परतला आणि त्याने सराव सुरू केला. तसेच स्लिपमध्ये झेलचा सराव करताना पुन्हा त्याला त्याच अंगठ्याला दुखापत झाली. वैद्यकिय पथकाने वेळीच त्याच्यावर उपचार केले.
गिलची दुखापत गंभीर नसल्याचे कळते. ही एक दिलासादायक बाब असून, या दुखापतीमुळे तो सराव सामना किंवा पहिल्या कसोटीला मुकणार का, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
समजा, गिल पहिल्या सामन्याला मुकला तर त्याच्याजागी संघाचे नेतृत्व विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल करू शकतो. राहुल सध्या संघाचा उपकर्णधार आहे, मात्र गिल सामन्यासाठी पूर्णपणे फिट असावा, हीच अपेक्षा आहे. कारण ही मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025-26 चा भाग आहे आणि यामध्ये भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
WTC च्या गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानी आणि श्रीलंका सहाव्या स्थानी आहे. पहिल्या तिन्ही स्थानावर तीन चॅम्पियन संघ (ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड) आहेत. चौथ्या स्थानी बांगलादेश आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका पहिला कसोटी सामना गॉल येथे खेळला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेला भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुकला असून रवींद्र जडेजाचे पुनरागमन झाले आहे. तसेच संघात सारांश जैन आणि औकिब नबी या दोन नव्या खेळाडूंची निवड झाली आहे.
श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ – शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जास्वाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), साई सुदर्शन*, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, औकिब नबी.






